Pune Nana Peth Crime | पुणे : क्रेनचा हूक डोक्यावर पडून कामगाराचा मृत्यू, 5 जणांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Nana Peth Crime | पथदिव्याचा खांब काढताना क्रेनचा हूक डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना नाना पेठेतील डोके तालीम चौक परिसरात घडली. ही घटना बुधवारी (दि.3) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. पांडुरंग अमृतराव म्हस्के (वय 35, सध्या रा. धनकवडी, मूळ रा. जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रेवण तुळशीदास नाथ (वय-28 रा. गाडीतळ हडपसर), फैय्याज इद्रीस अहमद उर्फ इम्तियाज (वय-24 रा. मंगळवार पेठ), सीमा जांभळे (वय-45 रा. येरवडा), बाबु शिंदे (रा. धनकवडी), योगेश बबन म्हस्के (रा. शेवाळवाडी, पुणे) यांच्यावर आयपीसी 304(अ), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड (PSI Akshay Kumar Gord) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महापालिकेकडून (Pune PMC News) नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पथदिव्याचा खांब काढण्याचे काम बुधवारी (दि.3) सकाळी करण्यात येत होते. हे काम एका ठेकेदाराकडे सोपविण्यात आले होते. इलेक्ट्रिशियन असलेले म्हस्के ठेकेदाराकडे कामाला होते. जांभळे क्रेन सर्व्हिस (एमएच 12 एसई 3474) यांच्या मार्फत खांब काढण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर मयत म्हस्के हे साहित्य गोळा करीत होते. अचानक क्रेनचा अवजड लोखंडी हूक तुटून म्हस्के यांच्या डोक्यात पडला. म्हस्के यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

म्हस्के हे साहित्य गोळा करत असताना क्रेनवरील चालक व इतर आरोपींनी क्रेनच्या हुकला जोडलेली वायर चांगली आहे की नाही याची खातरजमा केली नाही. वायर सुस्थितीत नसतांना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन हि क्रेन कामासाठी वापरली. तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षेची साधने पुरवली नाहीत. पांडुरंग म्हस्के काम करत असल्याचे माहित असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करुन क्रेनचा हुक वर खेचला. त्यामुळे हूक तुटून पांडुरंग म्हस्के यांच्या डोक्यात पडून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : अल्पवयीन मुलीवर 59 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार