Pune-Nashik ACB Raid | लाचखोर अधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड ! पुण्यातील घरात सापडली लाखोची रोकड; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Nashik ACB Raid | आदिवासी विभागातील (Tribal Division) लाचखोर (Bribe) कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल (Executive Engineer Dinesh Kumar Bagul) यांच्या नाशिकच्या घरातून तब्बल 98 लाख 63 हजार तर पुण्यातील घरातून 45 लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे (Pune) अशा दोन्ही ठिकाणाहून 1 कोटी 44 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली (Nashik ACB Raid) असल्याची माहिती आहे (House Search From ACB). याशिवाय अद्यापही बागुल यांच्या अनेक घरांत झाडाझडती सुरु असून पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर केला जात असल्याचे समजतेय. (Pune-Nashik ACB Raid)

 

नाशिक एसीबीच्या छापेमारीत आतापर्यंत करोडो रुपयांची रोकड सापडली आहे. तर दिनेशकुमार बागुल यांच्या इतर घरांची झाडती घेतली जाणार आहे. त्यामुळे अधिकची रोकड जप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच त्यांच्या लॉकरची देखील झडती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका कार्यकारी अभियंत्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने त्याने कोणकोणत्या प्रकरणात पैसे घेतले याचा देखील तपास केला जाणार असल्याचे समजतेय. बागुल यांनी रोकड, सोने, बेनामी संपत्ती अशी कोट्यावधी रुपयांची माया जमवल्याचा एसीबीला संशय आहे. (Pune-Nashik ACB Raid)

 

काय आहे प्रकरण?

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.25) खूप मोठी कारवाई केली आहे. नाशिक एसीबीच्या पथकाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) तब्बल 28 लाख रुपये लाच घेताना आदिवासी विभागाच्या कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना नाशिक एसीबीने लाच घेताना अटक (Accepting Bribe) केली. बागुल यांनी सेंट्रल किचन बिल (Central Kitchen Bill) मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती.

 

या कारवाईत नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील (Tribal Development Department) बांधकाम विभागाचे अभियंता दिनेशकुमार बागुल यांना 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. दीड कोटी रुपयांचे बील मंजूर करण्यासाठी बागूल यांनी ठेकेदाराकडे (Contractor) रकमेच्या 12 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. ठेकेदाराने नाशिक एसीबीकडे बागुल यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना बेड्या ठोकल्या. पथकाने 28 लाखांची लाचेची रक्कम जप्त केली.

दिनेशकुमार बागुल या अधिकाऱ्याकडे नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचा संशय एसीबीच्या अधिकाऱ्यांना आहे.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवस सापळा रचून ही कारवाई केली.
गेल्या दोन दिवसात एसीबीने अनेक कारवाया केल्या आहेत. मात्र, कालची ही कारवाई सर्वात मोठी आहे.
नाशिकच्या आदिवासी विभागात कोट्यवधी रुपयांच्या बिलाच्या फाईल पडून असतात.
नाशिकचे आदिवासी विकास भवन हे केवळ नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी नसून संपूर्ण राज्याचं आहे.
येथून राज्यातील आदिवासी विकास विभागाचे कामकाज चालवले जाते.

 

Web Title :- Pune-Nashik ACB Raid | Assets Worth Crores Of Bribe Taking Executive
Engineer Dinesh Kumar Bagul Nashik Pune Katraj ACB Raid House Search

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा