Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर रिक्षाची ट्रॅव्हल्सला धडक, एकाचा मृत्यू

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | ट्रॅव्हल्स बसला रिक्षा पाठिमागून जोरात धडकून झालेल्या अपघातात रिक्षातील एका प्रवाशाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू (Death) झाला. तर तीन जण जखमी झाले. हा अपघात 7 डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर (Mumbai-Bangalore Highway) नवले ब्रिजच्या (Pune Navale Bridge Accident) पुढे उतार संपल्यावर झाला.

यशवंत झांझुर्णे (वय-54 रा. विक्रोळी) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत अनिकेत यशवंत झांझुर्णे (वय-24 रा. नवतरुण चाळ, सुर्यनगर, विक्रोळी वेस्ट मुंबई) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) बुधवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. यावरुन ट्रॅव्हल्स बस क्रमांक एमएच 04 एच वाय 7152 वरील चालकावर आयपीसी 279, 283, 304अ, 337, 338, 427 सह मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) 134 (अ) (ब), 184, 119/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Navale Bridge Accident)

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या रिक्षातून आई-वडील व नातेवाईकांसह जात होते.
नवले ब्रिजच्या पुढे उतार संपल्यानंतर बस थांबा नसताना आरोपी वाहन चालक फिर्यादी यांच्या रिक्षाला ओव्हरटेक करुन
पुढे जाऊन अचानक थांबला. त्यामुळे फिर्यादी यांची रिक्षा बसला पाठिमागून जोरात धडकली.
यामध्ये फिर्यादी, त्यांची आई-वडिल व दत्तात्रय खानझोडे हे गंभीर जखमी झाले.
गंभीर जखमी झाल्यामुळे फिर्यादी यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.
वडिलांचा अंत्यविधी करुन तसेच आईचा डिस्चार्ज झाल्यानंतर अनिकेत झांझुर्णे यांनी बुधवारी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Pune Police) येऊन फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बुनगे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Police News | भागीदाराची पाच कोटींची फसवणूक, बिल्डर डॉ. महेश कोटबागी यांच्यावर गुन्हा दाखल; वारजे परिसरातील प्रकार

Pune Police MPDA Action | वारजे माळवाडी परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 73 वी स्थानबध्दतेची कारवाई