Pune NCP Iftar Party | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोमीनपुरा येथे इफ्तार पार्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP Iftar Party | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोमीनपुरा (Mominpura Pune) येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी मुस्लिम समाजातील नागरिकांची अत्यंत मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. अजित पवार (Ajit Pawar) यांनी रोजे ठेवणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या (Ramadan 2023) शुभेच्छा दिल्या. (Pune NCP Iftar Party)

 

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले या पवित्र महिन्यामध्ये सर्वांनाच सुख-समृद्धी प्राप्त व्हावी. तसेच समाजात शांतता प्रस्थापित करण्याकरिता तसेच देशातील सर्व धर्मीयांमध्ये सौदाह्य प्राप्त होण्याकरता आपण सर्वांनीच एकत्र येऊन या पुढील काळात निश्चित प्रयत्न करायला हवेत. रोजा ठेवणाऱ्या सर्व बांधवांना आत्मिक बळ प्राप्त व्हावे हीच आपण प्रार्थना करूयात. (Pune NCP Iftar Party)

सदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap NCP), खा. वंदना चव्हाण (MP Vandana Chavan), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल (IPS Sandeep Singh ), जयदेव गायकवाड (Jaydev gaikwad), अंकुश काकडे (Ankush Kakade), प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh NCP) , इकबाल शेख, समीर शेख, इकराम ख़ान इम्तियाज, तांबोळी, यूसुफ़ शेख़, जिमी पटेल, गणेश कल्याणकर, मौलाना काजमी. ह भ प गणेश ठकार , भंते हर्षवर्धन शाक्य, ग्यानी प्रताप सिंह व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

 

Web Title :  Iftar Party at Mominpura on behalf of Nationalist Congress Party

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा