Pune NCP | बंडातात्या कराडकर यांच्या विधानाचा पुणे राष्ट्रवादीकडून ‘जोडे मारो’ आंदोलन करुन निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व संसदरत्न (Sansadratna) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य (Offensive Statement) केले. बंडातात्या कराडकर यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील संत ज्ञानेश्वर पादुका चौक (Sant Dnyaneshwar Paduka Chowk) येथे पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वात ‘जोडे मारो’ आंदोलन (Jode Maro Andolan) करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला.

 

 

यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, ‘संतांची भूमी’ म्हणून संपूर्ण जगात महाराष्ट्राची ओळख आहे. वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. संपूर्ण जगाला सद्भावनेचा, मानवतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायात (Varkari) बंडातात्या कराडकर यांच्यासारख्या वाईट प्रवृत्तींनी घुसखोरी केली आहे. वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा हा सुनियोजित कट असू शकतो. ही बाब वेळीच ओळखून अशा प्रवृत्तींना बाजूला करावे असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले. बोलणारी व्यक्ती आपल्याला दिसत असली तरी त्या व्यक्तीचा बोलविता धनी कोण आहे याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी नमूद केले. (Pune NCP)

 

 

 

 

 

या आंदोलनास पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून बंड्यातात्या कराडकर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन (Shivajinagar Police Station) येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे (Ankush Kakade), राजलक्ष्मी भोसले (Rajlaxmi Bhosale), प्रदीप देशमुख (NCP Pradip Deshmukh), मृणालिनी वाणी (Mrinalini Vani), अशोक खांदवे (Ashok Khandwe), ॲड.रुपाली पाटील (Adv. Rupali Thombre Patil), महेश हांडे, किशोर कांबळे, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | Pune NCP protests against bandatatya Karadkar’s statement with ‘Jode Maro’ agitation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Group चे ‘हे’ 2 शेयर करून देतील चांगला नफा! स्टॉक्समध्ये होऊ शकते 30% पर्यंत वाढ; राकेश झुनझुनवाला यांनही केलीय गुंतवणूक

 

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त ! माधव वाघाटे खून प्रकरणातील सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक

 

Maharashtra Police | दुर्दैवी ! शारीरिक कसरती करताना 27 वर्षीय पोलिसाचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील डिकसळ गावावर शोककळा