Pune NCP | खड्ड्यासोबत सेल्फी काढा अन् मिळवा 11,111 रुपयांचे बक्षिस, राष्ट्रवादीची अनोखी स्पर्धा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  गेल्या साडेचार वर्षात पुणे शहरात रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेला पुणेकर वैतागले आहेत. मात्र सत्ताधारी भाजप (BJP) शहरातील चकाचक रस्त्यांची फसवी जाहिरातबाजी करणारे होर्डिंग्ज शहरात लावत आहेत. त्यामुळे पुणे शहरातील रस्त्यांची खरी अवस्था समोर आणण्याची गरज आहे. या हेतूनेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Pune NCP) भाजपची पोलखोल करण्यासाठी खड्ड्यासोबत सेल्फी (selfie) काढा अन् बक्षीस जिंका, स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जास्तित जास्त पुणेकरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पुणे राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP) पक्षाकडून करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP city president Prashant Jagtap) यांनी सांगितले की, गेल्या साडेचार वर्षात पुणे शहराच्या झालेल्या दुरावस्थेला सर्व सामान्य पुणेकर वैतागलेले आहेत.
त्यांच्या मनातील हा रोष पुणेकर येत्या महापालिका निवडणुकीत (municipal elections) मतपेटीतून दाखवणार आहेतच.
शहरात खड्डे, उखडलेले ड्रेनेज यांचा त्रास पुणेकर सहन करत असतांनाच भाजपने चकाचक
रस्त्यांची फसवी जाहिरातबाजी (Advertising) करणारे होर्डिंग्ज (Hoardings) शहरभर लावले आहेत.
आता पुणे शहराची खरी अवस्था सर्वांसमोर आणण्याची गरज आहे.

या हेतूनेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे  विकासाची पोलखोल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
यात सर्वसामान्य पुणेकरांनी उखडले रस्ते, रस्त्यांवरील खड्डे या समस्येसोबतचे सेल्फी किंवा
शॉर्ट व्हिडीओ (Short video) सोशल मीडियावर #Polkholpune या हॅशटॅग सह पोस्ट करावयाचे आहेत.
यापैकी उत्कृष्ट सेल्फी व व्हिडीओला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे प्रत्येकी 11,111 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभागी होऊन भाजपच्या फसव्या विकासाची पोलखोल करावी,
असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.

 

Web Title : Pune NCP | Take a selfie with the pit and get a prize of Rs 11,111, a unique competition of the NCP

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajay Devgn | अजय देवगनला विचारला प्रश्न, नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांच्यात कोण मजबूत? जाणून घ्या अभिनेत्याचे उत्तर

Aadhaar Card मध्ये आता ‘या’ कागदपत्राशिवाय अपडेट होईल अ‍ॅड्रेस, जाणून घ्या नियम