×
Homeताज्या बातम्याPune News | गेल्या अडीच वर्षांत PMRDA क्षेत्रात 3 हजार अनधिकृत बांधकामे

Pune News | गेल्या अडीच वर्षांत PMRDA क्षेत्रात 3 हजार अनधिकृत बांधकामे

पुणे : Pune News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या Pune Metropolitan Region Development Authority (पीएमआरडीए – PMRDA) हद्दीत गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत तीन हजार ६१४ अनधिकृत बांधकामे (Unauthorized Construction) झाली आहेत. पीएमआरडीएकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची प्रतिक्षा आहे. (Pune News)

राज्य शासनाने (State Government) गुंठेवारी अधिनयम २००१ मध्ये अलीकडेच सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार पीएमआरडीएने आपल्या कार्यक्षेत्रातील गुंठेवारीत झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची बांधकामे नियमित करता येणार आहेत. नोंदणीकृत वास्तुविशारद किंवा नोंदणीकृत स्थापत्य अभियंतामार्फत अर्ज दाखल करायचे असून अनधिकृत बांधकामधारकांना यासाठी सातबारा उतारा, स्ट्रक्चरल इंजिनिअरचे स्थैर्य प्रमाणपत्र दाखला (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) तसेच ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचे बांधकाम असल्याबाबतचा गुगल नकाशा आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. त्याकरिता आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, पीएमआरडीएकडे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी अत्यल्प म्हणजेच ३४ अर्ज सप्टेंबरपर्यंत आले आहेत. (Pune News)

पीएमआरडीएची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण, कारवाई केलेल्या आणि गुन्हे दाखल केलेल्या अनधिकृत बांधकामांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये गेल्या अडीच वर्षांत (२०२० पासून आतापर्यंत) मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत.

पीएमआरडीए क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा आढावा

कालावधी         बेकायदा बांधकामे            कारवाई             गुन्हे दाखल व्यक्ती क्षेत्रफळ (चौ.फूट)
२०१५-१८         १२१३ ६५                     शून्य                          ७५,९९८

२०१९             २८०४ ५६                     शून्य                          २,९६,९७९
२०२०             १६८७ १९                      ५९                            ४२,२६९

२०२१             १३४२ ३६                     १७                             १,४७,२२६
२०२२             ५८५ ५४                       १८                             ३,१८,६३३

एकूण             ७६३१ २६३                    ९४                             १०,५२,७२६ 

Web Title :- Pune News | 3 thousand unauthorized constructions in PMRDA area in last two and a half years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Satara Lane | मुंबई-सातारा लेन आज रात्री दोन तास बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Accident News | पुण्यातील MIT कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू, नारायणगाव येथील घटना

Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News