Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार

लातूर : Latur Accident News | तुळजापूरहून (Tuljapur) देवदर्शन घेऊन जाणार्‍या कारला एस टी बसची (Car ST Bus Accident) धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात (Latur Accident News) ५ जणांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात उदगीर – नळेगाव रस्त्यावरील (Udgir – Nalegaon Road) हैबतपूरच्या पुढे मंगळवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात (Government Hospital, Udgir) दाखल करण्यात आले आहे.

खासगी कारमधील ठार झालेले पाचही जण उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होते. (Latur Accident News)

याबाबतची माहिती अशी, उदगीर आगाराची बस आगारातून सकाळी सव्वा आठ वाजता चाकूरकडे रवाना झाली होती.
उदगीरमधील एक खासगी कार तुळजापूरहून देवदर्शन करुन परत येत होती. बस हैबतपूर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूरहून परत येणार्‍या कारने वेगाने बसला समोरुन धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की त्यात कारचा चक्काचूर झाला. कारमधील ५ जण जागीच ठार झाले. बसमधील १० जण जखमी झाले असून त्यांना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Web Title :- Latur Accident News | returning from Tuljapur after darshan; Five people died on the spot in a car-ST bus collision Accident News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T20 World Cup 2023 वेळापत्रक जाहीर ! ‘या’ दिवशी होणार भारत पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना

Shivpal Singh | भालाफेकपटू शिवपाल सिंग उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी; 4 वर्षाची बंदी

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करुन घडवून आणला गर्भपात; तरुणाविरुद्ध बलात्काराबरोबरच अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल