Pune News | संस्कृती प्रतिष्ठानतर्फे अधिक मासानिमित्त 33 मेहुणांचा गौरव ! पूजा,भोजनासह संस्कृती प्रतिष्ठानकडून यथोचित आयोजन

उत्तम सामाजिक कामगिरी करणाऱ्या दांपत्यांचा सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासानिमित्त पुण्यातील परंपरा जपणाऱ्या संस्कृती प्रतिष्ठान आणि बोधनी परिवाराकडून ३३ मेहुणांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूजा,भोजनासह यथोचित आयोजन करण्यात आले .मंगळवार,दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा ते दीड या वेळेत हा पारंपरिक कार्यक्रम अश्वमेध कार्यालय ,कर्वे रस्ता येथे झाला. संस्कृती प्रतिष्ठान आणि बोधनी परिवाराच्या वतीने संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष बोधनी यांनी स्वागत केले. (Pune News)

‘अधिक मासात जावयाला भोजन आणि भेटवस्तू,दान देण्याची धार्मिक परंपरा आहे. त्यात अनोखी भर टाकण्यासाठी समाजात उत्तमोत्तम कामगिरी करणाऱ्या दांपत्यांना निमंत्रित करून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा घाट घातला ‘,असे शिरीष बोधनी यांनी सांगितले. या दांपत्यांना दीपदान देखील करण्यात आले. (Pune News)

Pune News

या गौरव कार्यक्रमाला निवृत्त एअर व्हाइस मार्शल पी. एल. पुरोहित, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, प्रा. अनिरुद्ध देशपांडे
( बी. एम. सी. सी.) ,प्रा. विकास मठकरी, पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर ,पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद मराठे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार काकिर्डे , प्रा. श्रीराम गीत,मुंबई दूरदर्शनचे निवृत्त ज्येष्ठ दिग्दर्शक अरुण काकतकर, शिरीष रायरीकर , प्रा.श्रीराम गीत , मित्र फाऊंडेशनचे सुबोध चांदवणकर, मेधा चांदवणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fighter Movie Teaser Out | ऋतिक व दीपिकाच्या बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर आऊट

Maharashtra Political News | सुप्रिया सुळेंनंतर अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेलांनी घेतली नवाब मलिकांची भेट, पटेलांनी सांगितलं कारण

Pune Railway Police | स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन पुणे लोहमार्ग पोलिसांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन; गहाळ झालेले मोबाईल मुळ मालकांना परत