Fighter Movie Teaser Out | ऋतिक व दीपिकाच्या बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर आऊट

पोलीसनामा ऑनलाइन – Fighter Movie Teaser Out | बॉलीवुडमध्ये अनेक बिग बजेट चित्रपट एकामागोमाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामध्ये बहुचर्चित अशा ‘फायटर’ चित्रपटाचा देखील समावेश आहे. ऋतिक रोशन (Hrithik Roshan) व दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या ‘फायटर’ चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज (Fighter Movie Teaser Out ) करण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर ‘फायटर’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर व त्यांचे पहिले लूक आऊट करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर ‘फायटर’ चित्रपटाचा टीझर व्हायरल होत आहे.

‘फायटर’ चित्रपटाचा टीझर अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि ऋतिक रोशन यांनी त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर रिलीज केला आहे. यामध्ये लढाऊ विमानाच्या जवळ वैमानिक म्हणून चित्रपटातील कलाकारांचे लूक दिसत आहेत. पहिल्यांदा ऋतिक रोशन व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे फायटर विमानाच्या वैमानिकाच्या वेशभूषेमधील लूक दिसून येत आहे. त्यानंतर अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा देखील अशा प्रकारचा लूक दिसून आला आहे. या बरोबर टीझरमध्ये ऐकू येणारे ‘सुजलाम् सुफलाम’ हे शब्द रोमांच निर्माण करत आहेत. त्याचबरोबर ‘फायटर’ चित्रपटाची रिलीज डेट (Fighter Movie Release Date) देखील जाहीर करण्यात आली आहे. ‘फायटर’ हा बहुचर्चित सिनेमा भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच फायटर चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अनेक दिवसांपासून ‘फायटर’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबत उत्सुकता दिसत आहे.
दीपिका आणि ऋतिक यांना स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
आता त्यांच्या लूक देखील आऊट (Fighter Movie Teaser Out) झाला असून चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख देखील
जाहीर झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांनी केले असून त्यांनी या आधी ‘वॉर’
(War) आणि ‘पठान’ (Pathaan) या सुपहिट चित्रपटांचे देखील दिग्दर्शन केले आहे.
‘फायटर’ चित्रपट 250 कोटी रुपयांच्या बिग बजेट मध्ये बनवण्यात आलेला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर
धुमाकूळ घालणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘मी लपून का जाऊ? मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता’, शरद पवारांच्या भेटीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

ACB Trap News | दोन लाखांची लाच मागणाऱ्या शिक्षकाविरुद्ध एसीबीकडून FIR