Pune News | पुण्यातील तरुणीने परदेशी मैत्रिणींबरोबर इटलीत साजरी केली दिवाळी; फराळाचा घेतला आस्वाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | भारतीय जगभरात कोठेही असले तरी दिवाळी सण कधीही विसरु शकत नाही. परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या पुण्यातील तरुणीची ही इटलीत पहिलीच दिवाळी होती. तिने आपल्या परदेशी मैत्रिणींबरोबर लक्ष्मी पूजनाबरोबरच खास पुणेरी फराळ करुन दिवाळी साजरी (Pune News) केली.

 

पुण्यातील ऐश्वर्या भिसे (Aishwarya Bhise) ही अ‍ॅकॅडेमिया कॉस्च्युम आणि मोडा फॉर मास्टर्स इन अ‍ॅक्सेसरीज डिझायनिंग या एक वर्षाच्या कोर्ससाठी सध्या इटली येथे गेली आहे. गेल्या ८ महिन्यांपासून ती इटलीमध्ये तिच्या परदेशी मैत्रिणींबरोबर रहात आहे. तिने आपल्या मैत्रिणींना दिवाळीविषयी सांगितल्यावर त्या खूपच उत्साहीत झाल्या. मेलिका नेजाती (इराण), लीना एस्टेल गियारा (फ्रान्स) आणि सेल्कन उयसल (तुर्की) या तिच्या मैत्रिणींना तिने भारतात दिवाळी कशी साजरी केली जाते. घराघरात कशी पूजा केली जाते, हे समजावून सांगितले. त्यांनीही भारतीय साडी नेसून दरवाजात रांगोळी काढून पणत्या लावल्या. ऐश्वर्या बरोबर लक्ष्मीपूजन केले. त्यानंतर सर्वांनी लाडु, कंरजी, चकली, शंकरपाळे या फराळाचा आस्वाद (Pune News) घेतला.

 

Web Title :- Pune News | A young woman from Pune celebrated Diwali in Italy with her foreign friends

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 54 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra Rains | पुढील 3 दिवस कोकण-मराठवाड्यात ‘धो-धो’ पाऊस ! पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह ‘या’ 12 जिल्ह्यांना हाय अलर्ट

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’