Pune News | अभिषेक जोशी यांना ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा युवा उद्योजक’ पुरस्कार प्रदान

उद्योजकांच्या शौर्याचा सन्मान कौतुकास्पद – डॉ. प्रमोद चौधरी

पुणे : Pune News | हिंदू महासंघातर्फे (Hindu Mahasangh) देण्यात येणारा ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा युवा उद्योजक पुरस्कार’ (Shrimant Thorale Bajirao Peshwa Young Entrepreneur Award) अभि ग्रुपचे (Abhi Group) मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक जोशी (Abhishek Joshi) यांना रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२३ व्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे हे पहिलेच वर्षे होते. (Pune News)

हा कार्यक्रम रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृह,टिळक रस्ता येथे झाला.प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी (Dr. Pramod Chaudhary) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘अभी ग्रुप ‘चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जितेंद्र जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला सौ.अदिती अत्रे-पेशवा आणि उद्योग मार्गदर्शक मिलिंद तारे यांची विशेष उपस्थिती होती. महेंद्र मणेरीकर , चैतन्य जोशी, अभिषेक जोशी, एड. नीता जोशी, संगीता गोडबोले, योगिनी शुक्ला, दिनकर सापनाईकर (बार्शी) या उद्योजकांचा देखील पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांनी स्वागत केले. (Pune News)

प्रमोद चौधरी म्हणाले, ‘पेशव्यांच्या कडे वेगळ्या दृष्टीकोणाने पाहिले जाते. त्यांनी इंग्रजांकडे राज्य सोपवले असे सांगीतले जाते. मात्र, पेशव्यांचे शौर्य अतुलनीय होते. त्या शौर्याचे स्मरण करण्याचा, उद्योजकांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम महत्वाचा आहे’.

‘उद्योजकता विकासाच्या उपक्रमांना प्राज इंडस्ट्रीज पाठिंबा देत राहील. उद्योजकांनी नफा पेक्षा कॅश फ्लोची काळजी घेतली पाहिजे. आता लढाई प्रदूषण आणि कार्बन फूट प्रिंटची आहे. कचरा निर्मूलनाची आहे. पाणी जपून वापरण्याची आहे. पुढच्या पिढीला नैसर्गिक संसाधने सुरक्षित पणे देणे, ही महत्वाची जबाबदारी आहे’, असेही चौधरी यांनी सांगीतले.

अदिती अत्रे -पेशवा म्हणाल्या,’ थोरल्या बाजीराव पेशवे यांच्या जयंती निमित्त हिंदू महासंघ यांनी मिरवणूक सुरू केली ही कौतुकास्पद आहे. पानिपत युद्धानंतर भारताकडे पाहण्याची हिंमत झाली नाहीं, हे यश असल्याने आपण ‘पानिपत होणे’ म्हणजे अपयश, असे मानता कामा नये.

जितेंद्र जोशी म्हणाले, ‘शनिवार वाड्याची उभारणी पासून अटकेपर्यंत झेंडे फडकवणे, हा पेशव्यांचा गौरवास्पद इतिहास आहे. शनिवारवाड्याची वास्तू शौर्याचे प्रतिक आहे.’

अभिषेक जोशी यांनी सत्काराला उत्तर देताना 20 देशातील उद्योजकतेचा प्रवास सांगितला.
‘वय हा एक आकडाच आहे, कोणत्याही वयात आपण उद्योजक होवू शकतो.
नफा हा देखील एक आकडा असतो, उद्योजकतेची धडाडी महत्वाची असते,’ असे ते म्हणाले.

मनोज तारे यांनी प्रास्ताविक केले. विद्या घटवाई यांनी सूत्र संचालन केले. रुपाली जोशी यांनी आभार मानले.

चांगले नागरिक घडविण्यासाठी कार्यरत रहा: डॉ प्रमोद चौधरी

कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिती जोशी, अर्चना मराठे यांनी डॉ प्रमोद चौधरी आणि डॉ जितेंद्र जोशी यांच्याशी
संवाद साधला. डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, ‘पर्यावरण स्नेही इंधन निर्मिती द्वारे कार्बन फूट प्रिंट कमी
करण्याकडे प्राज इंडस्ट्रीज कार्यरत आहे. इथेनॉल निर्मिती मुळे भारतातील शेतकरी समृद्ध होतील
या दिशेने वाटचाल सुरू आहे. चांगले नागरिक निर्माण करण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यायला हवा,
त्यातून चांगला समाज घडेल, असे चौधरी म्हणाले.

अभिषेक जोशी यांनी त्यांच्या उद्योजकतेचा प्रवास उलगडला. उद्योजकाचा विचार आणि कृती ग्लोबल असली पाहिजे,
असे त्यानी सांगितले. फ्रेंड सोशल रिस्पॉन्सबिलिटी (एफ एस आर) संकल्पनेची माहिती देवून आपल्या मागे पडलेल्या
मित्रांना प्रगतीच्या संधी मिळवून द्या, असे आवाहन केले. प्रमोद चौधरी यांनी ‘पर्सनल सोशल रिस्पॉन्सबिलिटी’
संकल्पनेची माहिती दिली आणि वयक्तिक पातळीवर सामाजिक योगदान देण्याचे आवाहन केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gram & Raisins | हरभरे आणि हे ड्रायफ्रूट खा, आरोग्याचे होतील 5 मोठे फायदे, हाडे होतील मजबूत, जाणून घ्या पद्धत