×
Homeताज्या बातम्याPune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला...

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

पुणे : Pune News | जून ते ऑगस्ट या कालावधीत पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, तर काही ठिकाणी आलेल्या पुरामुळे शेती आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे बाधित झालेल्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून तीन कोटी १८ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. (Pune News)

जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाच कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यापैकी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला असून या निधीचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नऊ हजार १९२ शेतकऱ्यांच्या दोन हजार २४७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत.
या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तीन कोटी १८ लाख रुपये, शेतजमीन नुकसानीसाठी १५ लाख रुपये,
मृत जनावरांसाठी ७४ लाख रुपये, पूर्णतः नष्ट झालेली, पडझड झालेली कच्ची व पक्की घरे, झोपड्या
आणि गोठ्यांसाठी एक कोटी २० लाख रुपये अशा एकूण पाच कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Pune Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी राज्य शासनाकडे केली होती.
त्यापैकी तीन कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचे वितरण स्थानिक पातळीवर केले जात आहे,
असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune News)

तीन वर्षांपासून २९ कोटी ५२ लाखांचा निधी अप्राप्त

अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर अशा विविध कारणांनी नुकसान झाल्याने पुणे जिल्ह्यातील बाधितांना नुकसानीपोटी द्यायचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. मात्र, हा निधी शासकीय कोषागारात प्राप्तच झालेला नाही.
गेल्या तीन वर्षांपासूनचा तब्बल २९ कोटी ५२ लाख ४७ हजार १५ रुपयांचा निधी लाल फितीत अडकला आहे.
या अडकलेल्या निधीमध्ये सन २०१९ मध्ये २५ सप्टेंबर रोजी शहरात झालेला ढगफुटीसदृश्य पावसामुळे झालेले
नुकसान भरपाई, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये शेतीपिक नुकसान,
तौक्ते चक्रीवादळ, सन ऑक्टोबर २०२१ मधील अतिवृष्टी आणि डिसेंबर २०२१ मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या
नुकसानीचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title :- Pune News | Collector office received 3 Crore 18 Lakhs fund received for heavy rain damage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | लॉन्ड्री चालकाचा खून करुन मृतदेह फेकला डेक्कन परिसरातील नदीपात्रात, प्रचंड खळबळ

Fiber Rich Foods | जपानी लोकांसारखे दिर्घायुष्य हवे असेल तर खाण्यास सुरुवात करा ‘हे’ 6 सुपरफूड

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News