Fiber Rich Foods | जपानी लोकांसारखे दिर्घायुष्य हवे असेल तर खाण्यास सुरुवात करा ‘हे’ 6 सुपरफूड

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fiber Rich Foods | शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते, त्यातील एक म्हणजे फायबर. फायबरमुळे पचनक्रिया मजबूत होते. यासोबतच शुगर लेव्हल (Sugar Level) सुद्धा नियंत्रणात राहते. फायबरयुक्त पदार्थ (Fiber Rich Foods) हृदयासाठी खूप चांगले असतात. याशिवाय ग्लोईंग स्किन, वजन कमी करण्यासाठी फायबर खूप महत्त्वाचे मानले जाते.

 

अपचन आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर आहारात भरपूर फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करून मात करता येते. अशा स्थितीत, जर तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर फायबर तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. (Fiber Rich Foods)

 

एका संशोधनानुसार, फायबर (Fiber) समृध्द अन्न, ज्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात, ते ब्लू झोनच्या आहाराचे ठळक वैशिष्ट्य आहेत. ब्लू झोनमध्ये जगातील 5 अशा ठिकाणांबाबत सांगण्यात आले आहे जिथे लोक सर्वात जास्त, निरोगी आयुष्य जगतात. हे 5 झोन खालीलप्रमाणे आहेत-

 

1. ग्रीस
2. इटली
3. जपान
4. कोस्टा रिका
5. कॅलिफोर्नियाचे Loma Linda

बीन्स, नट, धान्य, औषधी वनस्पती आणि हिरव्या भाज्या यासारख्या सामान्य हरस-फायबर पदार्थ ब्लू जोन्स आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. येथे मांसाहारी पदार्थांऐवजी शाकाहारी पदार्थांचे सेवन केले जाते.

 

संशोधनात असे दिसून आले आहे की आहारात फायबरचा समावेश केल्याने पचनशक्ती मजबूत होते, साखरेची पातळी नियंत्रित होते आणि कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव होतो. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे वजनही कमी होते. यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) नुसार, एखाद्या व्यक्तीने दररोज 28 ग्रॅम फायबर खावे. जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमध्ये फायबर असते –

 

1. बीन्स (Beans) –
बीन्समध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. प्रथिने आणि फायबर भरपूर असल्याने ते खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. हरभरा, राजमा, वाटाणा, मसूर इत्यादी कडधान्ये आणि बीन्समध्ये प्रोटीन, फोलेट आणि लोह यासारखे पोषक घटक आढळतात. अर्धा कप राजमामध्ये 8 ग्रॅम फायबर आढळते.

 

2. धान्य –
धान्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. धान्यांमध्ये गहू, बार्ली, मका, ब्राऊन राईस, ब्लॅक राईस, बाजरी, क्विनोआ इ. चा समोवश होतो. यामध्ये फायबर व्यतिरिक्त, प्रोटीन, व्हिटॅमिन बी, अँटिऑक्सिडंट्स आणि आयर्न, झिंक, कॉपर आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे देखील आढळतात.

 

3. नट्स (Nuts) –
यामध्ये बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड आणि शेंगदाणे यांचा समावेश आहे. यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. ते पचनासाठी देखील खूप चांगले आहे.

 

4. ब्रोकोली (Broccoli) –
ब्रोकोलीमध्ये फायबरसोबतच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी आढळते. 100 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये 2.6 ग्रॅम फायबर आढळते.

 

5. फळे (Fruits) –
नाशपती, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी इत्यादी फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर व्यतिरिक्त, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, थायामिन, रिबॉफ्लाविन, व्हिटॅमिन बी 6, कॅल्शियम आणि झिंक देखील आढळते.

6. फ्लेक्स सीड्स (Flax seeds) –
आळशीच्या बीयांना फ्लेक्स सीड्स असेही म्हणतात. फायबर, खनिजे, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, कॉपर,
ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, फॉस्फरस सोबतच हे घटकही भरपूर प्रमाणात आढळतात.
100 ग्रॅम फ्लॅक्स सीडमध्ये 27 ग्रॅम फायबर असते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fiber Rich Foods | fiber rich foods for healthy life you should add in your diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kidney Stone | किडनी स्टोनमुळे असाल त्रस्त तर ‘या’ 5 विशेष पदार्थांमुळे होईल मदत, जाणून घ्या कोणते

Tips to Get Rid of Mucus | सर्दीनंतर छातीत साठला असेल कफ तर ‘या’ 4 पद्धतीने मिळवा आराम

Health Tips | इम्युनिटी वाढवण्यासाठी नियमित काढा पिता का? शरीराच्या या अवयवांचे होते नुकसान