Pune News : व्यापाऱ्याने दिली 110 कोटींची खोटी देयके; कसबेला न्यायालयीन कोठडी

पुणे : ११० कोटींहून अधिकचे खोटी देयके दिल्याचा ठपका ठेवत राज्य वस्तू व सेवाकर विभागाने पुण्यातील एका व्यापाऱ्याला अटक केली आहे. बाबुशा शरणप्पा कसबे असे या व्यापा-याचे नाव आहे. कसबे यांनी मे खुशी ट्रेडर्ससाठी वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अंतर्गत नोंदणी दाखला घेतला. या कंपनीच्या माध्यमातून त्याने ११० कोटी रकमेची फक्त बिले देऊन १६ कोटी ८६ लाख रुपयांची आयटीसी पुढील खरेदीदारांना पाठवला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नाही यासाठी अनेक बोगस कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी देयकांतून सुमारे १६ कोटी ५७ लाख रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडीट प्राप्त करून घेतला, असे विभागाने केलेल्या कारवाईतुन पुढे आले आहे.

या कारवाई दरम्यान अशा प्रकारच्या बोगस कंपन्यांची माहिती राज्य वस्तू व सेवाकर विभागाला मिळाली आहे. त्यांच्याविरुद्ध देखील पुढील काळात कारवाई करण्यात येणार आहे. राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त दत्तात्रेय आंबेराव, सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रेय तेलंग यांच्या प्रयत्नातून ही अटक कारवाई झाली.

कसबेला न्यायालयीन कोठडी :
कसबे यास येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कसबे यांचे हे कृत्य हा एक दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार ते पाच वर्ष तुरुंगवासास पात्र आहे, असा युक्तिवाद विभागाकडून करण्यात आला