Pune News : पत्नी तरूणासोबत फिरताना दिसल्यानंतर पतीनं त्या तरूणाला चोपलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पत्नी एका तरुणासोबत फिरत असताना दिसून आल्यानंतर पतीने साथीदारांच्या मदतीने त्या तरुणाला बेदम मारहाण केली. तर त्याच्या मित्रांनी देखील त्याला मारहाण केली आहे.

याप्रकरणी शंतनू वावरे (वय 28) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मारहाण करणाऱ्या पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे मैत्रिणीसोबत विश्रांतवाडी परिसरातून जात होते. यावेळी मैत्रिणीच्या नवऱ्याने या दोघांना एकत्र पाहिले. त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने दोघांनाही रस्त्यात थांबवले. ‘माझ्या बायकोबरोबर का फिरतोस’ अशी विचारणा करीत पट्ट्याने बेदम मारहाण केली. दरम्यान तक्रार आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर पतीला अटक केली आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.