Pune News : बिर्याणी आणण्यासाठी गेलेल्या तरूणा बरोबर किरकोळ वाद, हॉटेल व्यवसायिकाकडून साथीदाराच्या मदतीनं युवकाला मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बिर्याणी आणण्यासाठी हॉटेलात गेल्यानंतर 10 रुपये कमी असल्याने वाद झाल्यानंतर हॉटेल व्यवसायिकाने साथीदारांच्या मदतीने एका तरुणाला जबर मारहाण केल्याची घटना धायरी परिसरात बेनकर वस्तीत घडली.

अशोककुमार शेदीलाल मोर्य (वय ४०, रा. बेनकर वस्ती) याला अटक केली आहे. तर, सरफरोज उर्फ सफरू फकरोद्दीन शहा (वय २६) याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अंकुश लक्ष्मण काळे (वय २७, रा. नारायण बिल्डींग, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरीतील बेनकर वस्ती येथे आरोपींचे बॉम्बे बिर्याणी सेंटर नावाचे हॉटेल आहे. या ठिकाणी फिर्यादी हे बुधवारी रात्री हॉटेलात बिर्याणी आणण्यासाठी गेले होते. त्यांनी बिर्याणी घेतल्यानंतर दहा रूपये कमी पडले. त्यावरून आरोपींनी त्यांच्या सोबत वाद घालण्यास सुरूवात केली. वादवाद सुरू झाल्यानंतर आरोपींनी इतर व्यक्तींना बोलवून घेतले. त्यांनी काळे यांना पाईप व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.