Pune News | धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी घनशाम राजेंद्र ढोलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | अमरावती येथील घनशाम राजेंद्र ढोले याने समर्थवाडी संस्थान आणि विश्वस्तांवर केलेल्या खोट्या व निराधार आरोपांमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे शहर चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन येथे पुणे शहरातील भाविकांनी लेखी तक्रारीद्वारे केली आहे. (Pune News)

समर्थवाडी अमरावती हे धार्मिक संस्थान असून राज्यासह देशभरात ह्या संस्थानचा भाविक वर्ग मोठ्या संख्येने पसरला आहे. कोणत्याही प्रसिध्दीच्या मागे न लागता संस्थानचे प्रमुख विश्वस्त असलेले 95 वर्षीय पूज्य भाऊसाहेबांनी आपल्या हयातभर योगिराज गोविंद महाराज माकनेर यांनी घालून दिलेल्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरा अविरत सुरू ठेवल्या आहेत. (Pune News)

त्याकरिता त्यांनी आपल्या हयातीत अपार श्रम सोसले आहेत. असे पुज्यनिय भाऊसाहेब आमच्यासाठी दैवत असून आमच्या दैवतावर घनशाम राजेंद्र ढोले सारख्या विकृत मानसिकता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने धादांत खोटे तथा तथ्यहीन आरोप केल्याने आमच्या धार्मिक भावनांना ठेच पोचली आहे, अशा भावता व्यक्त करत , अशा विकृत आणि विघ्नसंतोषी व्यक्तीवर आमच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी पुणे शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी उपस्थित भाविक मंडळींनी केली आहे.

तक्रार देण्यासाठी पुणे शहर व तालुका येथील भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
घनशाम राजेंद्र ढोले हा विकृत मानसिकतेचा व्यक्ती असून त्याने यापूर्वीही इतर धार्मिक संस्थान
तसेच अनेक खाजगी व्यक्तींवर सुध्धा केसेस दाखल करून स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या सततच्या अशा कृत्यामुळे भाविक वर्ग आणि जनमानसाच्या धार्मिक भावनांना ठेच लागते. अशा व्यक्तीवर पोलिसांनी
तात्काळ कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole On PM Narendra Modi | मोदींवर नाना पटोलेंचा गंभीर आरोप, प्रधानमंत्री पीकविमा योजना
शेतकऱ्यांच्या नव्हे, त्यांच्या मित्रांच्या फायद्यासाठी