Nana Patole On PM Narendra Modi | मोदींवर नाना पटोलेंचा गंभीर आरोप, प्रधानमंत्री पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या नव्हे, त्यांच्या मित्रांच्या फायद्यासाठी

जळगाव : Nana Patole On PM Narendra Modi | प्रधानमंत्री पीक विमा योजनेवरून (Pradhan Mantri Pikvima Yojana) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधानांवर गंभीर आरोप (Nana Patole On PM Narendra Modi) केला आहे. राज्यातील भाजपा सरकार (BJP Government) शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक रुपयात पीकविमा योजना सुरू केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या नाही तर पंतप्रधान मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे. ते जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

नाना पटोले यांनी म्हटले, राज्य सरकार (State Government) शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत.

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, राज्य सरकाने सोयाबिनच्या नुकसानभरपाईपोटी २५ टक्के शेतकऱ्यांना द्यावेत, असे पत्र विमा कंपन्यांना दिले. पण ते पत्र विमा कंपन्यानी केराच्या टोपलीत टाकले. विमा कंपन्या सरकारला भीक घालत नाहीत. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या नाही तर पंतप्रधान मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी आहे.

पटोले म्हणाले, जळगावामधील केळी उत्पादक व कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. केळीला भाव मिळत नाही आणि केळीवर पडलेल्या रोगामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही भाजपा सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकारने या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. (Nana Patole On PM Narendra Modi)

पटोले पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढील पंधरवड्यात राज्यातील प्रत्येक तालुका व जिल्ह्यात काँग्रेस आंदोलन करणार आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आले.

पण मागील १० वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र दहापट वाढल्या आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळला असता तर शेतकऱ्यावर ही परिस्थीती आली नसती.

केळी, कापूस याचे जे झाले तेच कांद्याचेही झाले. कांदा बाजारात आल्यावर मोदी सरकारने ४० टक्के निर्यात कर लावून
शेतकऱ्यांवर अन्याय केला. राज्यातील परिस्थिती पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करुन मदत केली पाहिजे.

भाजपा सरकारने बेरोजगारांच्या जखमेवरही मीठ चोळले आहे. राज्यातील एक मंत्री तर बेकारी नाही असे
जाहीरपणे म्हणतात. हा प्रकार तरुणवर्गाचा अपमान आहे.

तरुणांना नोकरी मिळत नाही दुसरीकडे तरुण पिढीला बरबाद करणारा डड्ढग्जचा काळा धंदा जोरात सुरू आहे.
तरुण पिढीला बरबाद करणारा हा अंमली पदार्थांचा काळाधंदा बंद झाला पाहिजे, असे पटोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘मी पुन्हा येईन’च्या ट्विटवरील व्हिडिओवर प्रतिक्रीया देताना पटोले
म्हणाले, तो व्हिडिओ एका तासात डिलीट करण्याची वेळ त्यांच्यावर आली, ते जनतेच्या मनातूनच डीलीट झालेले आहेत.
फडणवीस व भाजपा जनतेच्या मनातुनही उतरले आहेत.
सध्या सोशल मीडियाची ताकद प्रचंड वाढली आहे. त्यांच्या ट्विटवर काय प्रतिक्रिया आल्या ते पहा.

लोकच म्हणतात आता तुम्हाला संधी नाही. कंत्राटी नोकर भरती रद्द केली हे सांगत असताना सोशल मीडियावर
तरुणांच्या काय प्रतिक्रीया होत्या तेही पहा. भाजपा हा खोटारडा पक्ष आहे हे जनतेला समजले आहे,
त्यामुळे त्यांच्यावर आता कोणी विश्वास ठेवत नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | गावबंदीमुळे अजितदादांनी माळेगाव कारखान्यात जाणे टाळले, शरद पवार म्हणाले – ‘योग्य निर्णय…’

Pune Sassoon Drug Case | पुणे: ससून ड्रग रॅकेट प्रकरणांत विधानपरिषद उप सभापती व 7 आमदारांची चुप्पी शहरासाठी धोक्याची घंटा !

NCP Chief Sharad Pawar On PM Narendra Modi | PM मोदींना आता थेट शरद पवारांनी दिले प्रत्युत्तर, कृषिमंत्री असताना काय केले? भलीमोठी यादीच वाचली!

Maharashtra Political News | भाजपाच्या ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…

Mumbai Pollution | आदित्य ठाकरेंमुळे वाढले मुंबईचे प्रदूषण; आशिष शेलारांचा हास्यास्पद आरोप