Pune News | श्री पूना गुजराती बंधू समाज, दि पूना गुजराती केळवणी मंडळ व महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | श्री पूना गुजराती बंधू समाज, दि पूना गुजराती केळवणी मंडळ व महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ या सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून आज मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी शनिवार वाड्याच्या मागे असलेल्या हरिभाई व्ही. देसाई कॉलेज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ०९:०० वाजता पूना हॉस्पिटल & रिसर्च सेंटरचे जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी व मुकुंद भुवन ट्रस्ट चे प्रमुख पुरुषोत्तम लोहिया व दि पूना गुजराती केळवणी मंडळ चे अध्यक्ष व श्री पूना गुजराती बंधू समाज चे मॅनेजिंग ट्रस्टी राजेश शहा यांच्या हस्ते सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. आपले रक्त एखाद्या गरजू रुग्णाचे प्राण वाचवू शकते या जाणिवेतून शिबिरात सहभागी झालेल्या सजग नागरिक व विद्यार्थांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.(Pune News)

सदर रक्तदान शिबिराचे संचालन पूना हॉस्पिटल च्या राकेश जैन मेमोरिअल ब्लड सेंटर या रक्त पेढी मार्फत करण्यात आले. त्यांचे डॉक्टर्स व तंत्रज्ञ यांनी शिबिराचे संचालन उत्तम पद्धतीने हाताळले.

शिबिराच्या सुरुवातीलाच धवल शहा यांनी स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची उत्तमरित्या सुरुवात करून दिली. या शिबिरात एकूण १२२ बॅग रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान झाल्यानंतर सर्व रक्तदात्यांना रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत नैनेश नंदू, राजेंद्र शहा, केतन कपाडिया, वल्लभ पटेल, जनक शहा, हेमंत मणियार, दिलीप जगड, विनोद देडिया, संदीप शहा, माधुरीनेन शहा, , शरद श्राफ इत्यादी द पूना गुजराती बंधू समाज व द पूना गुजराती केळवणी मंडळाचे ट्रस्टी व पदाधिकारी यांचा सहभाग आहे. तसेच शिबीर यशस्वी होण्यासाठी हरिभाई व्ही देसाई कॉलेजचा संपूर्ण स्टाफ़ यांनी अविरत श्रम घेतले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार