Pune News | आज “अजिंठ्या ” च्या लेण्यांनाही दाटून आलं…..

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | मानवी भावना आणि निसर्ग यांचं नातं आपल्या लेखणीतून साकारणारे निसर्गकवी ना धो. महानोर आज आपल्यातून निघून गेले , ही बातमी माझ्यासाठी मनाला वेदना देणारी आहे.. माझ्या संगीत कारकीर्दीची सुरुवातच महानोर दादांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ” दूरच्या रानात ” या अल्बम पासून झाली. सुमित कंपनीचे संचालक ” सुभाषजी परदेशी साहेब ” यांनी “दूरच्या रानात ” या अल्बम चे संगीत तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. (Pune News)

त्या वेळी मी दादांना भेटायला जळगावला गेलो … ज्यांची जैत रे जैत, पळसखेडची गाणी ऐकत ऐकत लहानाचा मोठा झालो अश्या ज्येष्ठ गीतकाराला भेटायचे आणि ते ही पहिल्या अल्बमचा नवखा संगीतकार म्हणून , खूप मोठं दडपण होतं. पण दादांनी मनमोकळ्या स्वभावाने पहिल्या बैठकीतच ते दूर केलं आणि दूरच्या रानात या कवितेवर काम सुरू झालं…महानोर दादांनी साहित्य क्षेत्रात केलेलं आभाळाएवढे काम आणि माझं पहिलं काम , असं असूनही दादांनी मला चाली तयार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं.. आठ गाणी करायची होती ,कधी जळगाव , कधी पळसखेड या ठिकाणी आमच्या बैठका होत असत.

ADV

ज्या ज्या वेळी मी त्यांच्या घरी गेलो, त्या त्या वेळी त्यांनी दिलेला पाहुणचार भारावून टाकणारा होता… दूरच्या रानात आणि त्यांच्या ईतर कवितेतील अनेक शब्द हे त्यांच्या बोली भाषेतील होते त्यांचे अर्थ ते अश्या प्रकारे उलगडून दाखवत, की जणू ती पांदी, ती पायवाट, तो निसर्ग, ती झाडांची दाटी, जर्द पानांची सळसळ, आपण प्रत्यक्ष अनुभवतोय.. ईतके मानसन्मान, प्रसिद्धी मिळूनही सर्वांशी जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं ठेवणारा, आपल्या माय मातीशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवणारा रानकवी शरीरानं जरी आपल्यात नसला तरी आपल्या समृद्ध साहित्याच्या रूपाने नेहमीच आपल्यासोबत राहणार (Pune News)

आदरणीय महानोर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली

हर्षित अभिराज
(संगीतकार आणि पार्श्वगायक )

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Session 2023 | ‘बारामती शेजारील मतदारसंघातही उभं राहायचं धाडस नाही’,
अजित पवारांची सभागृहात कबुली

Maharashtra Assembly Session 2023 | विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना
फडणवीसांची उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोपरखळी; म्हणाले…