Maharashtra Assembly Session 2023 | ‘बारामती शेजारील मतदारसंघातही उभं राहायचं धाडस नाही’, अजित पवारांची सभागृहात कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Assembly Session 2023 | महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Congress MLA Vijay Wadettiwar) यांची विरोधी पक्षनेते पदावर (Opposition Leader) नियुक्ती करण्यात आली. महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांची विरोधी पक्षनेते पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी स्वत: अजित पवाराच काही आमदारांना घेत सत्तेत सामील झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Session 2023)

विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदावर नियुक्ती झाल्यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Session 2023) अभिनंदन प्रस्ताव आणण्यात आला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी बारामती शेजारील मतदारसंघात (Baramati Constituency) निवडणुकीला उभं राहायचं आपलं धाडस नाही, अशी स्पष्ट कबुली सभागृहात दिली. तसेच विजय वडेट्टीवार यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुकही केलं.

अजित पवार म्हणाले, तुम्ही ज्यावेळी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला, तेव्हा विदर्भात शिवसेनेचे अस्तित्व नव्हतं. मात्र तुम्ही चंद्रपूर, चिमूर आणि ब्रह्मपुरी अशा ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. तुमचं सगळं काम बघूनच 1998 साली तुम्हाला विधान परिषदेचे (Legislative Council) सदस्यपद मिळाले. त्यानंतर आज तुम्ही विधानसभेत (Legislative Assembly) विरोधी पक्षनेता झालात. तुमची विधीमंडळातील 25 वर्षांची राजकीय कारकीर्द झाली आहे. यापुढेही तुमची कारकीर्द अशीच चालू राहणार आहे. कारण तुम्ही शिवसेनेत असो किंवा काँग्रेसमध्ये तुम्ही तुमची राजकीय भूमिका सोडलेली नाही.

मतदारसंघ बदलणे अवघड

आमच्या भागात मतदारसंघ बदलणं फार अवघड असतं, म्हणजे मी बारामतीत पहिल्या क्रमांकाने निवडून येईल. पण शेजारच्या मतदारसंघात उभं राहण्याचं धाडस आपण दाखवू शकत नाही. पण तुम्ही संगमनेरमध्येही उभे राहून प्रचंड मताने निवडून येऊ शकता. आम्ही दुसऱ्या मतदारसंघात जाताना दहावेळा विचार करतो. पण तुम्ही मात्र चिमूरला निवडून आलात. ब्रह्मपुरीला दोनवेळा निवडून आला. अर्थात तुमचं काम चांगलं आहे. तुमचा जनसंपर्क चांगला आहे. म्हणून तुम्ही हे सगळं करु शकलात, असं अजित पवार म्हणाले.

मला टोमणे मारायची सवय नाही

विरोधी पक्षनेते पद द्यायचं म्हटलं तर तुमचं नाव दुसऱ्यांदा आलं.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे पद घेतील असं वाटलं होतं. मात्र जे लढायचं ते तुम्ही लढा नंतर पुन्हा दिवस चांगले आले की आम्ही आहोतच. अशा पद्धतीचा काहींचा स्वभाव असतो. मी कुणाचं नाव घेत नाही. गंमतीचा भाग सोडून द्या, माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही हे मी कृपा करुन आपल्याला संगळ्यांना सांगतो असं अजित पवार म्हणाले आणि त्यांनी हात जोडले.

मी शब्दाचा पक्का आहे

महाविकास आघाडीचं सरकार आणलं गेलं तेव्हा तुम्हाला बाळासाहेब थोरात,
अशोक चव्हाण यांना जशी खाती मिळाली तसं खाते मिळेल. ते मिळालं नाही,
त्यावेळेस माझी आणि तुमची काय चर्चा झाली? हे तुम्हाला आणि मला माहित आहे.
मी ते कुणालाच सांगणार नाही मी शब्दाचा पक्का आहे तुम्हाला माहिती आहे.
पण कुठेतरी माणसाला वाईट वाटतं, वेदना होतात, असंही अजित पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Session 2023 | विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन
करताना फडणवीसांची उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोपरखळी; म्हणाले…