Pune News | शेठ बेचरदास मानचंद जैन श्वेतांबर ट्रस्टच्या सुप्रसिद्ध ‘वाडी’च्या नुतनीकरण केलेल्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | शेठ बेचरदास मानचंद जैन श्वेतांबर ट्रस्ट (Sheth Bechardas Manchand Jain Shwetambar Trust) या संस्थेच्या सुप्रसिद्ध “वाडी” च्या नुतनीकरण केलेल्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन जयराज ग्रुपचे (Jayaraj Group, Pune) संचालक राजेश शहा (Rajesh Shah) व मालव शहा (Malav Shah) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्ट “वाडी” या संस्थेचे अध्यक्ष भरतभाई शहा (Bharatbhai Shah), उपाध्यक्ष दिलीप मेहता (Dilip Mehta), सचिव सुनील शहा (Sunil Shah) जयराज ग्रुप पुणे यांचा परिवार (चोखावाला परिवार – Chokhawala Pariwar) व समाजातील निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune News)

 

शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्ट या संस्थेची स्थापना समाजातील काही जाणकार मंडळींनी एकत्र येऊन सन १९६५ साली केली.
ह्या संस्थेची “वाडी” या नावाने ओळखली जाणारी इमारत त्यावेळी ७९७, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे याठिकाणी बांधण्यात आली होती.
ती इमारत जुनी व जिर्ण झाली होती.
म्हणून ती पाडुन त्या जागी अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त समाजोपयोगी आकर्षक अशी चार मजली इमारत (साधारण ३० हजार स्क्वे. फूट) बांधण्यात आली आहे.
ह्या नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे “जयराज भवन” असे नामकरण करण्यात आले आहे.
या चार मजली इमारती मध्ये तळ मजल्यावर स्वागत कक्ष, ट्रस्ट मिटिंग रूम व कॉन्फरन्स हॉल बांधण्यात आले आहेत.
तर पहिल्या मजल्यावर अत्याधुनिक सुविधांनी युक्त मंगल कार्यालय बांधलेले आहे.
तसेच दुसऱ्या मजल्यावर प्रशस्त किचन व डायनिंग हॉल तयार करण्यात आले आहेत.
त्याच बरोबर सदर चार मजली इमारतीमध्ये तीन मल्टी पर्पज सुसज्य हॉल देखील बांधण्यात आले आहेत.
आणि राहण्यासाठी २७ वातानुकूलित रूम सुद्धा सज्ज करण्यात आलेल्या आहेत.
ही इमारत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असली तरी येथे पार्किंगची ही सोय करण्यात आली आहे. (Pune News)

ह्या सर्व वास्तू समाजातील सर्व सामान्य लोकांना आपले लग्न कार्य, आनंद उत्सवाचे कार्यक्रम, सण, विविध उपक्रम, प्रदर्शने, मिटींग्स, कॉन्फरन्स इत्यादी साठी अत्यल्प मोबदल्यात उपलब्ध होणार आहे.

 

Web Title :- Pune News | Inauguration of the state of the art renovated building of Sheth Bechardas Manchand Jain Shwetambar Trusts famous Wadi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा