Pune Crime | मुल होत नसल्याने पतीसाठी दुसरी मुलगी पहायला घेऊन गेल्याने विवाहितेची आत्महत्या; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नानंतर मुलबाळ न झाल्याने पतीसाठी दुसरी मुलगी पहायला तिला जबरदस्तीने घेऊन गेले सासरी होणार्‍या मानसिक व शारीरीक छळाला कंटाळून विवाहितेने (Married Woman Suicide) आत्महत्या (Suicide In Pune) केली. (Pune Crime)

 

आसावरी सचिन धुमाळ (वय २८, रा. ढमाळवाडी, फूरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ रोहन गोविंद पोळ (वय २५, रा. जेजुरी, पुरंदर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पती सचिन वसंत धुमाळ (वय ३३), सासु वंदना वसंत धुमाळ (वय ६०), सासरे वसंत पांडुरंग धुमाळ (वय ६५), जाऊ अंजली स्वप्नील धुमाळ (वय २५), दीर स्वप्नील वसंत धुमाळ (वय २८, सर्व रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सचिन व आसावरी यांचा २०१४ मध्ये विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर तिला मुलबाळ होत नसल्याने सासरी तिचा शारीरीक व मानसिक छळ होत होता. तिचे लग्न झालेले असताना सुद्धा पती सचिन धुमाळ याचे मुलासाठी दुसरी मुलगी बघायला तिला ते जबरदस्तीने घेऊन गेले. तसेच सचिन तिला वेळोवेळी हाताने मारहाण करीत असे. या छळाला कंटाळून आसावरी हिने राहत्या घरी २६ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Married woman commits suicide by taking another daughter to see her husband as she is not having children Incidents in Hadapsar area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा