Pune News | ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषात १८ तास रंगला जेजूरीचा मर्दानी दसरा (Video)

जेजुरी : Pune News | तीर्थक्षेत्र जेजुरीत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मर्दानी दसरा (Jejuri Mardani Dasara) काल उत्साहात साजरा झाला. १८ तास हा सोहळा रंगला होता. घट उठल्यानंतर काल सायंकाळी ६ वाजता जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी आणि भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलला होता. (Pune News)

मानकऱ्यांच्या इशारतीने मर्दानी दसरा सोहळ्याला प्रारंभ झाला. खांदेकरी मानकर्‍यानी देवाची पालखी उचलली. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालत पालखी बालदारीत नेण्यात आली. भांडारगृहातून देवाच्या उत्सव मूर्ती सेवेकर्‍यांनी पालखीत ठेवल्यानंतर सोहळ्याने सीमोल्लंघणासाठी गडकोटाबाहेर बंदुकीच्या फैरींच्या सलामीत कूच केले.

यावेळी गडाच्या सज्जातून भाविकांनी भंडार्‍याची उधळण केली. मुख्य प्रवेशद्वारातून सोहळा गडकोटाबाहेर आल्यानंतर गडाला प्रदक्षिणा घालून सोहळा रमण्याकडे निघाला. गडाच्या पाठीमागील बाजूस सोहळा विसावला. रात्री ७ च्या दरम्यान या ठिकाणी टेकडीवर व डोंगराच्या उतारावर महिला, अबालवृद्ध व भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

रात्री ९ वाजता मार्तंड भैरवाचे मुळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा सुद्धा सीमोल्लंघणासाठी निघाला. दोन्ही मंदिराच्यामध्ये जयाद्रीची दीड किलोमीटरची डोंगररांग आहेत. येथे विजेची व्यवस्थ करण्यात आली होती. यामुळे परिसरातील विद्युत रोषणाई सुरेख दिसत होती. दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होती. (Pune News)

उत्सव मूर्तींच्या पालखीसमोर विविधरंगी शोभेचे दारूकाम आणि फटाक्यांची आतिषबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी जेजूरी गडाची पालखी डोंगर उतारावरून खाली दरीत रमण्याकडे उतरत होती. तर कडेपठारची पालखी सुसरटिंगीच्या टेकडीवर चढत होती.

यावेळी मर्दानी दसरा सणाचा अनुभव प्रत्येक भाविक घेत होता. भाविक देहभान हरपून उत्सवाची अनुभूती घेत होते.
मद्यरात्री जेजुरी गडाचा पालखी सोहळा रमण्यात पोहोचला, तर कडेपठारचा सोहळ्याने सुसरटींगी टेकडी सर केली.
रात्री दोन वाजण्याचा सुमारास शोभेच्या दारूकामाच्या आतिषबाजीत दोन्ही सोहळ्यातील उत्सव मुर्तींची देव भेट झाली.

यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. देवभेटीचा सोहळ्यानंतर जेजुरी गडाच्या पालखीचा सीमोल्लंघांनातून
सोने लुटण्याचा सोहळा रंगला. भाविकांनी रमन्यातील तळ्याकाठी सोने लुटले आणि उत्सवमूर्तींना अर्पण केले.

पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जुन्या जेजुरीमार्गे सोहळा गावात दाखल झाला. ठिकठिकाणचे औक्षण स्वीकारत सोहळा
मुख्य रस्त्याने गडकोटाकडे निघाला. सकाळी ७ वाजता पालखी सोहळा गडावर पोहोचला. सोहळ्यासमोरील सनई चौघडा,
धनगरी ओव्या, सुंभरान, लोककलावंतांची भक्तीगीते, लावण्या, देवाची गाणी व नृत्य सुरू होती.
भंडारगृहात उत्सव मूर्ती विसावल्यानंतर पेशव्यांनी रोजमारा वाटप केले आणि सोहळ्याची सांगता झाली.

मर्दानी दसरा उत्सव २०२३ – ऐतिहासिक खंडा स्पर्धा –

सालाबाद प्रमाणे ऐतिहासिक खंडा तोलणे व कसरत स्पर्धा संपन्न झाल्या. खांदेकरी, मानकरी, पुजारी सेवेकरी यांचे
सन्मान करण्यात आले. व विजेत्या स्पर्धकांना रक्कम व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

खंडा कसरत –
प्रथम क्रमांक नितीन कुदळे, द्वितीय क्रमांक विशाल माने, तृतीय क्रमांक प्रवीण गोडसे, चतुर्थ क्रमांक शिवा राणे,
पाचवा क्रमांक सचिन कुदळे, उत्तेजनार्थ सहावा क्रमांक चेतन कुदळे, उत्तेजनार्थ सातवा क्रमांक बापू राऊत.

खंडा तोलणे –
प्रथम क्रमांक अंकुश गोडसे, द्वितीय क्रमांक अमोल खोमणे, तृतीय क्रमांक हेमंत माने, चतुर्थ क्रमांक सुहास खोमणे,
पाचवा क्रमांक मंगेश चव्हाण, उत्तेजनार्थ सहावा क्रमांक गिरीश घाडगे, उत्तेजनार्थ सातवा क्रमांक संदीप दोडके.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा आक्रमक! साखळी उपोषणात दिला इशारा…तोपर्यंत नेत्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही

Punit Balan Group-Pune PMC News | शासनानेच निर्बंधमुक्त उत्सवाची घोषणा केल्यानंतर जाहिरात फलकाबाबत पुणे मनपाच्या आकाशचिन्ह विभागाने वैयक्तिक आकसापोटी आणि बदनामीच्या हेतूने बजावलेली नोटीस संपुर्णपणे बेकायदेशीर व चुकीचीच

Pune: Drug smuggler Lalit Patil’s escape from Sassoon Hospital: Rosary School Director Vinay Aranha arrested by Pune police