Pune News : स्व. प्रल्हाद सावंत स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा 2021 उत्साहात संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना आयोजित स्व. प्रल्हाद सावंत स्मृतिप्रीत्यर्थ क्रॉसकंट्री स्पर्धा क्रीडानगरी बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेचे उद्घाटन ओमप्रकाश बकोरिया आयुक्त क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य, विजय संतान जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे, अभय छाजेड उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटना यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

Covid-19 नंतर झालेल्या पहिल्याच क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील सुमारे साडेपाचशे खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये पुरुष (दहा कि.मी.)/ महिला (दहा कि.मी.) ,20 वर्षाखालील मुले (आठ कि.मी.)/मुली(सहा कि.मी.), 18 वर्षाखालील मुले(चार कि.मी)/मुली (चार किलो कि.मी) १६ वर्षाखालील मुले(दोन कि.मी.)/ मुली (दोन कि.मी.)असे आठ गट होते.

सदर स्पर्धेचा बक्षीस समारंभ गुरुबनस कौर छत्रपती पुरस्कार विजेते, बॅप्तीस डिसूजा, किशोर शिंदे, श्री मधू देसाई, विजय बेंगळे, चंद्रकांत पाटील, रामदास कुदळे, श्री शेखर कुदळे, रमेश कुदळे, आशा बेंगळे, मनीषा चपणे, पूर्णिमा जाधव, प्रमिला गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते हे करण्यात आला. पुरुष गटामध्ये मिनी ऑरेंज संघाला विजेतेपद व उपविजेतेपद प्रो ॲथलेटिक्स संघाला मिळाले 20 वर्षाखालील मुले या गटात विजेतेपद शौर्य अकॅडमी व उपविजेतेपद बनेश्वर क्रीडा प्रबोधिनी यांना मिळाले स्पर्धेचे आभार प्रदर्शन हर्षल निकम यांनी केले. पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना आयोजित कैलासवासी प्रल्हाद सावंत स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तर क्रॉसकंट्री स्पर्धा 2021 २४.०१.२०२१
अंतिम निकाल पुढील प्रमाणे

१६ वर्षाखालील मुली २ किमी धावणे
१. वेदश्री लोणारी एलिट रनर्स ७:१८.१३ से. प्रथम
२. सानिका वाले ट्रॅक फार्च्यून ७:३८.५६ से.द्वितीय
३. श्रावणी जाधव पुणे अथलेटिक्स ७:५१.७२ से.तृतीय

१८ वर्षाखालील मुली
१. सपना चौधरी लक्ष अकॅडमी १४:५४.३४ से. प्रथम
२. सायली गुंजाळे एच एस आर एफ १५:०४.५५ से. द्वितीय
३. शितल भगत लक्ष अकॅडमी १६:.०१.३९ से. तृतीय

२० वर्षाखालील मुली २ किमी धावणे
१. प्रतिमा यादव मिनी ऑरेंज २१:४८.९८ से. प्रथम
२. वृषाली उत्तेकर एलिट रनर्स २३:०८.९६ से. प्रथम
३. सिया मोळक लक्ष अकॅडमी २५:२७.४७ से. तृतीय.

महिला १० किमी धावणे.
१. स्वाती वानवाडे पुणे अथलेटिक्स ४१:०८.३३ से. प्रथम
२. ऐश्वर्या खळदकर ट्रॅक फार्च्यून ४१:२७.४५ से. द्वितीय
३.यीनाया मालुसरे एलिट रनर्स ४४:३४.९२ से. तृतीय

१६ वर्षाखालील मुले २ किमी धावणे
१. सचिन भारद्वाज एच एस आर एफ ६:१७.४४ से. प्रथम
२. गौरव भोसले एलिट रनर्स ६:२०.३६ से.द्वितीय
३. नकुल गोडसे पीएसी ६:२५.१३ से. तृतीय

१८ वर्षाखालील मुले
१. शरद ठोंबरे पी ए सी १९:४७.८० से. प्रथम
२. शेखर मकरेजा आर टी २०:१७.९४ से. द्वितीय
३. उस्मान राजपुर अभिजित कदम स्पोर्ट्स क्लब २०:३२.७२ से. तृतीय

२० वर्षाखालील मुले ८ किमी धावणे
१. सुहास बनकर ट्रॅक फॉर्च्यून २६:५२.३६ से. प्रथम
२. ओंकार रत्नोजी एलिट रनर्स २७:२६.३५ से. द्वितीय
३. दीपक सिंग पुणे ॲथलेटिक्स क्लब २७:३५.३१ से. तृतीय

पुरुष १० किमी धावणे
१. मनु सिंग मिनी ऑरेंज ३३:०७.४३ से. प्रथम
२.मनोजकुमार यादव मिनी ऑरेंज ३३:१९.६९ से. द्वितीय
३. निहाल बेग मिनी ऑरेंज ३३:२९.६५ से. तृतीय.