Pune News | पौड विविध कार्यकारी संस्थेवर भैरवनाथ ग्रामविकास पॕनलचे बहुमत

पुणे / पौड : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | पौड विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर पौडचे (Paud) माजी सरपंच विनायक गुजर (Vinayak Gujar) यांच्या पुरस्कृत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॕनचे Shri Bhairavnath Gramvikas Panel) वर्चस्व 13 पैकी 7 सदस्य निवडून आले आहेत. भैरवनाथ ग्रामविकास पॕनलचे राजाभाऊ भोयणे, सुरेशभाऊ ढोरे, जयंतराव भोयणे, बबनराव सोनवणे, लक्ष्मण वाल्हेकर, इंदुबाई सुपेकर, उज्वला ढोरे बिनविरोध विजयी झाले आहेत. ही निवडणुक (Pune News) बिनविरोध करण्यासाठी अ‍ॅड. सागर ढोरे (Adv. Sagar Dhore), उद्योजक मंदार इंगुळकर , सामाजिक कार्यकर्ते अतुल भुमकर यांनी परिक्षम घेतले. (Pune News)

पौड सोसायटीच्या निवडणुकीत 13 जागेसाठी 26 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
अर्ज छाननी च्या वेळेस श्री दिगंबरनाथ पॕनलचे माजी सरपंच संपत दळवी (Sampat Dalvi) यांना तीन अपत्य असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.
तसेच अतिश भुमकर , नंदा भुमकर, बापू ओंबळे हे थकबाकीदार असल्याने यांचा अर्ज बाद करण्यात आले.
महिलांसाठी दोन जागा असताना श्री दिगंबरनाथ पॕनलनी एकच अर्ज दाखल केला आणि तो ही छाननी मध्ये बाद झाल्याने श्री भैरवनाथ ग्रामविकास पॕनलच्या इंदुबाई सुपेकर व
उज्वला ढोरे बिनविरोध विजयी झाल्या आणि श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे पारडे जड झाले. (Pune News)

पौडचे माजी उपसरपंच महेश पढेर यांनी श्री दिगंबरनाथ पॅनल मधुन अर्ज दाखल केलेला परंतु निवडणुक होऊ नये यासाठी व श्री भैरवनाथ ग्रामविकास पॕनलला पाठिंबा देत
आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दोन्ही पॕनल मध्ये चर्चा चालु असताना चर्चा संपलेली नसताना ही लक्ष्मण पिंगळे याने श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनल सोडुन परस्पर
इतर मागास प्रवर्गातुन आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला.
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे आपआपसात संगनमत होऊन
माजी सरपंच विनायक गुजर यांच्या सुचने नुसार गणेश सुपेकर यांनी भटक्या विमुक्त जाती या आरक्षीत जागे मधुन माघार घेतली.

 

तसेच सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातुन प्रकाश भोयणे, लक्ष्मीबाई भोयणे, इंदुबाई सुपेकर यांनी श्री भैरवनाथ ग्रामविकास पॕनलला पाठिंबा देत आपली उमेदवारी मागे घेतली.
यामुळे श्री भैरवनाथ ग्रामविकास पॕनल चे राजाभाऊ भोयणे, सुरेशभाऊ ढोरे, जयंतराव भोयणे, बबनराव सोनवणे, लक्ष्मण वाल्हेकर, इंदुबाई सुपेकर,
उज्वला ढोरे बिनविरोध विजयी झाले आहेत.
तर श्री दिगंबरनाथ पॕनल मधुन भानुदास दळवी, गणेश जाधव , दादु साळुंके यांनी माघार घेतली.
यामुळे श्री दिगंबरनाथ पॕनलचे संजय देव, राजाभाऊ शिंदे, रमेश जाधव, महेंद्र भुमकर, दिलीप वाघवले, रामभाऊ वाल्हेकर असे सहा जण विजयी झाले आहेत.

सहकारी संस्थेचे तालुका साहयक निबंधक एस .बी. घुले (Assistant Registrar S.B. Ghule)
यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक अधिकारी म्हणुन एम. एम. नरुटे (M. M. Narute) यांनी काम पाहिले.

 

Web Title : Pune News | Majority of Bhairavnath Rural Development Panel on various executive bodies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earn Money | नोकरीला कंटाळला आहात तर सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिना होईल 5-10 लाख रुपयांची बंपर कमाई; जाणून घ्या कशी?

Pankaja Munde | ‘…कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी नाही, तर’, दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंची तुफान फटकेबाजी (व्हिडीओ)

Chhagan Bhujbal | ‘…तर आज मुख्यमंत्री झालो असतो’ – छगन भुजबळ