Pune News | मराठा उद्योजक लॉबी कमिटीचा कर्जत येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News । मागील काही दिवसात अतिमुसळधार पावसाने पुण्यासह (Pune) पूर्ण राज्याला झोडपले आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी पूरग्रस्त (Flooded) परिस्थिती निर्माण झाली होती. अशीच परिस्थिती खोपोली कर्जत (Khopoli Karjat) येथील उल्हास नदीला (Ulhas River) झाली. या परिसरात असणाऱ्या पुरग्रस्तांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर अनेकांचा संसार निकामी झाला. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठा उद्योजक लॉबीच्या (Maratha Entrepreneur Lobby) पुणे शहर जिल्हा आणि नगर शहर जिल्हा कमिटी यांनी मदतीचे दोन हात केले आहेत.

उल्हास नदीला आलेल्या पुराचा फटका कर्जत येथील इंद्रायणीनगर (Indrayaninagar) किनारा भागातील घरांना बसला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे अधिक नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी एक मदतीचा हात म्हणून मराठा उद्योजक लॉबीच्या (Maratha Entrepreneur Lobby) पुणे शहर जिल्हा आणि नगर शहर जिल्हा कमिटी पुढे आली आहे. कमिटीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी एकूण 650 पेक्षा अधिक अन्नधान्याचे किट (Food kits) तसेच, साधारण 500 पाणी बॉक्सचे (Water box) वाटप करण्यात आले आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठा उद्योजक लॉबीची दोन्ही कमिटी पुढे सरसावल्याने तेथील कर्जत, इंद्रायणीनगर भागातील पूरग्रस्त नागरिकांनी या कमिटीचे आभार मानले आहे.

या दरम्यान, पुरग्रस्तांच्या मदतीचे कार्य करण्यासाठी संस्थापक विनोदभाऊ बढे, संपर्कप्रमुख,
वैभवभाऊ फरतडे व कृषीराजभाऊ चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष केडी उर्फ कुलदीप पाटील तसेच, पवन
निकम, लखन सावंत, चंद्रकांत आहेर, राहूल साळुंखे, साई भामे, हेमंत ढोले, कल्याणी बाराथे आदी
कमिटीतील सदस्य उपस्थित होते.

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | उड्डाणपूल उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने छगन भुजबळ ‘नाराज’; पालकमंत्री म्हणाले…

Pune News | खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीचा वाचला प्राण (Video)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Maratha Entrepreneur Lobby Committee’s helping hand for flood victims in Karjat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update