Pune News : पेट्रोल, डिझेलच्या दरात कमालीची वाढ

पुणे : गेले काही दिवस सातत्याने सुरु असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या वाढीला ब्रेक लागण्याची शक्यता अजूनही दिसून येत नाही. २६ जानेवारीनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढ झाली आहे. पेट्रोलमध्ये २४ पैसे तर डिझेलमध्ये ३४ पैशांनी वाढ झाली आहे.

आज शुक्रवारी पेट्रोल ९२.५२ रुपये तर डिझेल ८१.७२ रुपये लिटर असा दर असणार आहे. २६ जानेवारी रोजी पेट्रोल ९२.२८ रुपये आणि डिझेल ८१.४६ रुपये लिटर असा दर होता़ सीएनजीचा दर ५५.५० रुपये कायम आहे.