Pune News | कैद्यांना नातेवाईकांशी महिन्यातून 3 वेळा बोलता येणार, कारागृह प्रशासनाचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | वेगवेगळ्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या कैद्यांचा मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी कारागृह प्रशासनाने (Jail Administration) मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील कारागृहातील कैद्यांना (Pune News) त्यांच्या नातेवाईकांना किंवा वकिलांना (Lawyers) प्रत्यक्ष भेटता येत नाही, अशा कैद्यांना आपल्या नातेवाईकांशी महिन्यातून तीन वेळा दूरध्वनीवर (Telephone) प्रत्येकी दहा मिनिटे बोलता येणार आहे.

कारागृहात कैद असलेल्या कैद्यांमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटता येत नसल्याने नैराश्य वाढू शकते. यासाठी 2014 पासून कैद्यांसाठी दूरध्वनी सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा वापरण्यासाठी कैद्यांना आपल्या नातेवाईक, वकील यांचा फोन नंबर कारागृह प्रशासनाकडे द्यावा लागणार आहे. या क्रमांकाची पोलीस प्रशासनाकडून तपासणी आणि खात्री झाल्यानंतर कैद्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या सुविधेत अजून सुलभता आणून जास्ती सोयीची करण्यात आली आहे. (Pune News)

कारागृहात असलेल्या ज्या कैद्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यास येत नाहीत अथवा क्वचित मुलाखत होते,
अशा कैद्यांना महिन्यातून तीनवेळा दूरध्वनी सुविधा प्रत्येकी दहा मिनिटे उपलब्ध करुन दिली आहे.
याशिवाय कारागृहातील कैद्यांना त्यांचे वकील सकाळी 9 चे 10.30 या कालावधीत भेटू शकतात.
तर ज्या कैद्यांना त्यांचे वकील प्रत्यक्ष भेटण्यास येत नाहीत,
अशा कैद्यांना महिन्यातून दोन वेळा दहा मिनिटे वकीलांसोबत दूरध्वनीवर बोलण्याची सुविधा देण्यात येत आहे.

Web Title :- Pune News | Prisoners can talk to their relatives 3 times a month, the decision of the prison administration

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Avadhoot Gupte | ‘या’ कारणासाठी ‘झेंडा’ चित्रपटानंतर स्वतः बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन

Kolhapur Crime News | शिवज्योत आणताना मोटारसायकल्स एकमेकांवर धडकून 2 शिवभक्तांचा दुर्दैवी मृत्यू, कोल्हापूरमधील घटना