Pune News : धक्कादायक ! तृतीयपथ्यांनी अल्पवयीन मुलीकडून ढकललं सेक्स रॅकेटमध्ये, पिडीत बनली आई, चौकशीदरम्यान पर्दाफाश, विमानतळ पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील वेश्याव्यवसायाने काळस गाठला असून, आई-वडील नसलेल्या अल्पवयीन मुलीला दोन तृतीयपंथी व इतरांनी वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत मुलगी ग्राहकाकडून गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म देखील दिला. यानंतर झालेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी आता माया महादेव उर्फ आरती काळे तसेच महादेव उर्फ भारती काळे (तृतीयपंथी) तसेच इतर तीन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात वेश्याव्यवसायावर कारवाई केली जात आहे. मात्र, त्यानंतर देखील छुप्या पध्दतीने वेश्याव्यवसाय सुरू आहे.

कोरेगाव पार्क सारख्या ठिकाणी स्पा तेजीत सुरू आहेत. एका पोलीस निरीक्षकांची कारवाई न केल्याने बदली करण्यात आली. तर नुकतीच तीन तोतया पत्रकारांना स्पा चालकाला खंडणी मागितल्याने अटक केली. विमानतळ परिसरात आता या अल्पवयीन मुलीचे प्रकरण उजेडात आले आहे. अल्पवयीन मुलीचे आई-वडीलांचा मृत्यू झाला. यानंतर ती एका ओळखीच्या महिलेकडे राहत होती. त्यावेळी तिची या दोन आरोपींसोबत ओळख झाली. त्या दोघांनी तिला वेश्याव्यवसायात ढकलले. त्यानंतर ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. तसेच तिला ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने एका मुलाला जन्म दिला. यानंतर महिला दक्षता समितीने चौकशी केली. यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहे.