Pune News | विश्रांतवाडी चौकातील फ्लाईओवर व ग्रेडसेपरेटरचे टेंडर काढून एका महिन्यात काम सुरू करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनपा प्रशासनास आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | शहरातील विश्रांतवाड़ी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी फ्लाईओवर (Vishrantwadi Chowk Flyover) व ग्रेडसेपरेटरचे नियोजन करण्यात आले आहे. या कामाचे टेंडर काढून महिन्याभरात काम सुरू करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनपा प्रशासनास (PMC Administration) शनिवारी दिली. या कामासाठी वडगांवशेरी मतदार संघाचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) सतत पाठपुरावा करीत आहेत. (Pune News )

कौन्सिल हॉल येथे शनिवारी सकाळी अजित पवार यांनी मनपा अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत विभिन्न विषयांसोबतच विश्रांतवाड़ी परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपायों की माहिती मागण्यात आली. बैठकीमध्ये आमदार सुनिल टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे व अन्य अधिकारी उपस्थित होते. (Pune News)

यावेळी मनपा प्रशासनाने विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात करण्यात येणार्‍या फ्लाईओवर व ग्रेडसेपरेटर सहित संपूर्ण कामाचे सादरीकरण करण्यात आले. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे समाधान देखील प्रशासनाने केले. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर अजित पवार यांनी एका महिन्याच्या अवधिमध्ये या कामाचे टेंडर काढून प्रत्यक्ष कामाची सुरूवात करण्याचा आदेश प्रशासनात दिला.

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी फ्लाईओवर आवश्यक

विश्रांतवाडी येथील मुकुंदराव चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी विभिन्न उपायांवर एकसाथ अंमलबजावणी
करणे गरजेचे आहे. या चौकात चार रस्ते एकत्र येतात, परंतु रस्त्यांच्या दिशा वेगळ्या असल्याने इतर ठिकाणी केलेल्या
उपायांवर येथे अंमलबजावणी करने योग्य नाही. येथे फ्लाईओवर व ग्रेडसेपरटची एकसाथ गरज आहे.
याकरिता मागील कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा केला जात आहे.
अनेक वेळा महापालिकेच्या अधिकार्‍यांसोबत प्रत्यक्ष पाहणी देखील केली आहे. येथील कामाच्या डिझाइन बाबतही अधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. आता या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करून या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातील.

सुनिल टिंगरे (आमदार – वडगावशेरी विधानसभा मतदार संघ – Vadgaon Sheri Assembly constituency)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Sharad Sonawane | “लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या त्या फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकर ही म्हणतात नेमकं काय घडणार?

Pune News | शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार