Pune News | महिलेसोबत गैरवर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करा, आझाद समाज पार्टीची पीएमपीएमएल प्रशासनाकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | निगडी बायपास गाडीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत पीएमपीएमएल कर्मचारी दत्तात्रय पांगरे (PMPML Employee Dattatray Pangre) याने गैरवर्तणूक करुन अंगावर धावून जात शिवीगाळ केली. तसेच पांगरे याने पीएमपीएमएल मध्ये काम करत असून देखील पीएमपीएमएलच्या नावाने शिवीगाळ केली. याप्रकरणी दत्तात्रय पांगरे यांना ताबडतोब निलंबित (Suspended) करावे, अशी मागणी आझाद समाज पार्टीचे (Azad Samaj Party) पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष (Pune City Yuva Morcha) निखिल भिंगारदिवे (Nikhil Bhingardive) यांनी केली आहे. याबबात पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते (PMPML Chairman and MD Dr. Sanjay Kolte) यांना निवेदन दिले आहे. यावेळी आश्रफ शेख, प्रज्योत गायकवाड, विशाल नागदिवे, समीर शेख, शाहिद नदाफ उपस्थित होते. (Pune News)

निगडी बायपास या गाडीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत पीएमपीएमएल कर्मचारी दत्तात्रय पांगरे याने गैरवर्तणूक करुन अंगावर धावून शिवीगाळ केली. पांगरे हा पीएमपीएमएल मध्ये काम करीत असताना देखील त्याने पीएमपीएमएल नावाने शिवीगाळ केली. तसेच त्याठिकाणी थांबलेल्या एका व्यक्तीने त्यांना जाऊदे असे बोलले असता पांगरे त्या व्यक्तीवर देखील खवळले. तुझा काय संबंध इथे बडबड करायचा, अशा पद्धतीने उद्धट भाषेत त्याला दम दिला. (Pune News)

जे कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी आहेत तेच कर्मचारी जर अशा प्रकारे जनतेशी वागत असतील तर त्यांना याठिकाणी
काम करण्याचा अधिकार नाही. तसेच आपण ज्या पीएमपीएमएल पगारावर जगतो त्या पीएमपीएमच्या नावाने शिव्या
देणे कितपत योग्य आहे. दत्तात्रय पांगरे या कर्मचाऱ्याला ताबडतोब कामावरुन निलंबित करण्यात यावे.
अन्यथा आझाद समाज पार्टीच्या वतीने कात्रज चौकात रस्ता रोको आंदोलन करु असा इशारा निखील भिगांरदिवे
यांनी निवेदनातून दिला आहे. या निवदेनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना
पाठवण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pramod Nana Bhangire-Kondhwa Dafanbhumi | शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या इशार्‍या नंतर कोंढवा येथील दफनभूमीचा प्रस्ताव अखेर पुणे महानगरपालिकेकडून रद्द !

Pune Police MPDA Action | कात्रज परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 74 वी स्थानबध्दतेची कारवाई