Pune News | पुणेकरांना मिळाली वैविध्यपूर्ण नाटकांची पर्वणी; काँग्रेस आणि हिंदमाता प्रतिष्ठान आयोजित नाट्य महोत्सवाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | नाटकांकडे प्रेक्षक पाठ फिरवत आहेत, अशी ओरड सर्रास ऐकू येते. मात्र, हिंदमाता प्रतिष्ठान (Hindamata Pratishthan) आणि राष्ट्रीय काँग्रेस (आय) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नाट्य महोत्सवातील नाटकांना ‘हाऊसफुल’चे फलक लागत असल्याचे पहायला मिळत आहे. महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rang Mandir Pune) गेली पाच दिवस प्रेक्षकांच्या उपस्थितीने तुडुंब भरल्याचे चित्र आहे. (Pune News)

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पु. ल. देशपांडे यांना हा नाट्य महोत्सव समर्पित करण्यात आला असून याचा प्रारंभ सोमवारी (ता. २५) मोठ्या दिमाखात झाला. ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या गाजलेल्या नाटकाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. त्यानंतर एका लग्नाची पुढची गोष्ट, हीच तर फॅमिलीची गंमत आहे, मर्डरवाले कुलकर्णी या विनोदी आणि गंभीर विषयांवरील नाटकांबरोबरच गौतमी पाटील यांचा कलाविष्कारही या महोत्सवात आजवर सादर झाला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून पुणेकरांना वैविध्यपूर्ण नाटकांची पर्वणीच मिळाली आहे. (Pune News)

रसिक आणि कलावंत यांना जोडणे, हा उद्देश समोर ठेवून हिंदमाता प्रतिष्ठान आणि काँग्रेसच्या वतीने सातत्याने
वैविध्यपूर्ण सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणजे हा नाट्य महोत्सव होय.
बालगंधर्व रंगमंदिर येथे ३१ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य आहे.
याचा अधिकाधिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
नाटकाच्या मोफत प्रवेशिका आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांचे जनसंपर्क कार्यालय, रविवार पेठ येथे उपलब्ध आहेत.

दरम्यान, महोत्सव स्थळी महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी खाद्य महोत्सवही घेण्यात आला आहे.
यासाठी महिला बचत गटांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशीही माहिती आयोजकांच्या वतीने
प्रतिभा धंगेकर (Pratibha Dhangekar) यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून वाहन चोरी करणार्‍या दोघांना अटक, 6 मोटारसायकली जप्त