Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून वाहन चोरी करणार्‍या दोघांना अटक, 6 मोटारसायकली जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-1 ने दुचाकी चोरणार्‍या (Vehicle Theft) दोघांना अटक केली असुन त्यांच्याकडून 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी 6 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Pune Police Crime Branch News)

कार्तिक दत्तात्रय दळवी (20, रा. त्रिमुर्ती फ्लेक्स प्रिटींगच्या पाठीमागे, शिळीमकर यांच्या घराजवळ, मु.पो. पौंड, ता.मुळशी, जि. पुणे) आणि दिगंबर उर्फ दिनु अंकुश आंब्रे (26, रा. दिगंबर नाथ तरूण मंडळ, सचिन शेंडकर यांच्या रूममध्ये, पौड, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Police Crime Branch News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील आणि श्रीकांत दगडे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली होती. आरोपी हे दुचाकी चोर असून ते दोघे वारजे ब्रिजजवळील चर्च जवळ थांबले आहेत. त्यांच्याजवळ यामादा एफझेड मॉडेलची मोटारसायकल असल्याचे पोलिसांना बातमीदारामार्फत समजले. पोलिसांनी सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलच्या कागदपत्रांची मागणी केली असताना दोघांची उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असून त्यांच्याकडे असलेली यामाहा चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना अटक केली.

अटक आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी कोथरूड पोलिस स्टेशन (Kothrud Police Station),
फरासखाना (faraskhana police station), खडक पोलिस स्टेशन (Khadak Police Station), हवेली पोलिस स्टेशन (Haveli Police Station) आणि अहमदनगर येथील कॅम्प पोलिस स्टेशनच्या (Camp Police Station Nagar) हद्दीतून एकुण 6 वाहने चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून एकुण 1 लाख 40 हजार रूपये किंमतीची वाहने जप्त केली आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे
(IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Krantikumar Patil), पोलिस उपनिरीक्षक शाहीद शेख
(PSI Shahid Shaikh), पोलिस अंमलदार आजीनाथ येडे, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, मॅगी जाधव, गणेश ढगे,
रविंद्र लोखंडे, सुमित ताकपेरे, महेश पाटील, श्रीकांत दगडे, साईकुमार कारके, शिवाजी सातपुते आणि नारायण बनकर
यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Anti-Encroachment Drive | आंबेगाव येथील अनधिकृत 11 इमारतींवर महापालिकेचा हातोडा, 500 सदनिका उध्वस्त

Pune Police MPDA Action | हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 76 वी स्थानबध्दतेची कारवाई

Bharat Todkari Passed Away | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार भारत तोडकरी यांचे निधन

वकिलांच्या फ्लॅटमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; दोघीही म्हणतात मी त्यांची सहायक

Pune Pimpri Accident News | ताम्हिणी घाटात बसला भीषण अपघात, २ महिलांचा मृत्यु, ५५ जखमी