Pune News | रोहित राऊतने गायलेल आणि प्रशांत नाकतीच संगीत असलेलं ‘नखरेवाली’ गाणं प्रदर्शित

गायक रोहित राऊतच्या आवाजात ऐका ‘नखरेवाली’ गाणं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | प्रत्येकाच्या आयुष्यात एक नखरेवाली किंवा एखादा नखरेवाला व्यक्ती असतोच. गायक रोहित राऊत आणि संगीतकार प्रशांत नाकती घेवून येत आहेत एक गावरान मराठमोळ गाणं ‘नखरेवाली’, या गाण्याच्या हूकस्टेप अगदी मनात बसणाऱ्या आहेतच शिवाय हे गाण ऐकल्यावर पाय आपोआप थिरकायला देखील लागतात. या गाण्यात निक शिंदे, रितेश कांबळे, अनुश्री माने आणि जाऊ बाई गावात या मराठी रिऍलिटी शोची फायनलिस्ट अंकिता मेस्त्री हे कलाकार आहेत. गायक रोहित राऊत सोबत गायिका सोनाली सोनवणे हिने गाण्याला स्वरसाज दिला आहे. या गाण्याच संगीत प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी केलं आहे. या गाण्याच दिग्दर्शन रोहित जाधव याने केलं असून या गाण्याच छायाचित्रीकरण सुरज राजपुत याने केल आहे. अभिनेता विशाल निकम, गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे खासगी सचिव अविनाश सोलवट आणि अन्य कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत या गाण्याचा प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला. (Pune News)

https://Nakhrewali.oia.bio/Official-Song

गायक रोहित राऊत ‘नखरेवाली’ गाण्याविषयी सांगतो, “जेव्हा प्रशांत सरांचा मला कॉल आला तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण मराठी म्युझिक अल्बम इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात टॉपची गाणी प्रशांत सरांची असतात. आणि त्यांच्यासोबत माझ हे पहिलच गाण आहे. हे गाण रेकॉर्ड करतानाही मला खूप मज्जा आली. हे गाणं खूप एनर्जेटिक झाल आहे, त्यामुळे प्रेक्षकांना हे गाण नक्कीच आवडेल.”

संगीतकार प्रशांत नाकती गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “नखरेवाली हे गावरान मराठमोळ एक लव सॉग आहे. मुलींचा निरागस आणि सोज्वळ नखरा टिपणार हे गाणं आहे. या गाण्याच चित्रीकरण नाशिकच्या एका सुंदर गावात झालेल आहे. आजचा काळ मॉडर्न झाला आहे तरीपण गावकडच निरागस प्रेम वेगळ्या रीतीने मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. गाण्यातील चारही कलाकार उत्तम डान्सर आहेत. हे गाणं ऐकल्यावर आपोआप पाय थिरकू लागतील.“

पुढे तो सांगतो, “दरवर्षी पाच मार्चला २०२१ पासून गाणं प्रदर्शित करत आहे.
२०२१ ला मी केलेलं माझी बायगो हे गाणं सगळ्यात हिट गेलं त्याचे आता १५० मिलियन व्ह्युज आहेत
तर २०२२ ला मी केलेलं आपलीच हवा या गाण्याला एका दिवसात सगळ्यात जास्त व्ह्युज मिळाले होते.
त्यानंतर २०२३ ला हार्टब्रेक झाला हे त्यावर्षातल माझ सगळ्यात हिट गाणं होत. आणि यावर्षी २०२४ ला मी मराठी म्युझिकवर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी ‘नखरेवाली’ हे गाणं घेवून आलो आहे. या गाण्यावर प्रेक्षक मायबाप सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप प्रेम देत आहेत. त्यांचं असच प्रेम कायम मिळो.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amit Shah On Sharad Pawar | अमित शहांचे टीकास्त्र, अवघा महाराष्ट्र ५० वर्षापासून शरद पवारांचं ओझं वाहतोय, त्या…

Pune Police ACP-Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्तायातील 26 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या, नियुक्त्या ! 3 ACP सह 11 पोलिस निरीक्षकांचा समावेश

Lok Sabha Elections 2024 | अमित शहांची सायंकाळी संभाजीनगरमध्ये सभा, महाराष्ट्र दौऱ्यात सभा-बैठकांचा धडाका, जागावाटपाचा प्रश्न सोडवणार