Amit Shah On Sharad Pawar | अमित शहांचे टीकास्त्र, अवघा महाराष्ट्र ५० वर्षापासून शरद पवारांचं ओझं वाहतोय, त्या…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Amit Shah On Sharad Pawar | मी शरद पवारांना सांगेन की, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पंतप्रधान बनून केवळ १० वर्षे झाली आहेत. या १० वर्षांमध्ये आम्ही देशाचा खूप विकास केला. परंतु, अवघा महाराष्ट्र ५० वर्षापासून शरद पवारांचे ओझे वाहत आहे. महाराष्ट्र त्यांना सहन करत आहे. त्या ५० वर्षांचा राहू देत, तुम्ही तुमच्या पाच वर्षांचा हिशेब द्या, अशी टीका भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

लोकसभा निवडणुकीसाठी अमित शाह यांची आज जळगाव येथे सभा झाली. या सभेत त्यांनी इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

मविआची तीनचाकी रिक्षा पंक्चर

अमित शाह म्हणाले, मी मोदी सरकारच्या काळातील दहा वर्षांचा हिशेब द्यायला इथे आलो आहे. पुन्हा एकदा भाजपाला मत देऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यास सहकार्य करा. महाविकास आघाडीला तीन चाकांची रिक्षा आहे. ही रिक्षा पंक्चर झाली असून महाराष्ट्राचा विकास करणार नाही.

आघाडीतील सर्व पक्ष स्वार्थी

इंडिया आघाडीवर टीका करताना अमित शाह म्हणाले, इंडिया आघाडीतील सगळे पक्ष स्वार्थी आहेत. प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला आपापल्या मुलांना मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान करायचे आहे. त्यांच्यातल्या सर्व पक्षांमध्ये घराणेशाही चालते.

आम्ही अतिरेक्यांना संपवले

अमित शाह म्हणाले, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांचे सरकार होते तेव्हा रोज बॉम्बस्फोट व्हायचे.
दहशतवादी भारतात येऊन बॉम्बस्फोट करुन पळून जायचे. त्यांना काहीच प्रत्युत्तर दिले जायचे नाही.
मग मोदींचे सरकार आले, उरी आणि पुलवामामध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला.
दहाच दिवसात पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन आतंकवाद्यांना संपवले.

काश्मीर भारताशी जोडले

अमित शाह म्हणाले, मोदी सरकारने काश्मीरचा प्रश्न सोडवला. मोदींनी काश्मीरला भारताशी जोडले. काँग्रेसने कलम ३७० हे ७० वर्षांपासून लटकवत ठेवले होते. आम्ही ते काढून टाकले. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाला संधी द्या.

७० वर्षे रामलल्लांना तंबूत ठेवले

शहा पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी भारताची अर्थव्यवस्था ११ व्या नंबरवरून ५व्या नंबरवर आणली आहे. ती आपल्याला तिसऱ्या नंबरवर न्यायची आहे. काँग्रेसला जे ७० वर्षांमध्ये जमले नाही ते आम्ही १० वर्षांमध्ये केले. त्यांनी व्होट बँकेसाठी ७० वर्षे रामलल्लांना तंबूत ठेवले. परंतु, आमच्या सरकारने रामलल्लांचे मंदिर बांधले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police ACP-Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्तायातील 26 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या, नियुक्त्या ! 3 ACP सह 11 पोलिस निरीक्षकांचा समावेश

Lok Sabha Elections 2024 | अमित शहांची सायंकाळी संभाजीनगरमध्ये सभा, महाराष्ट्र दौऱ्यात सभा-बैठकांचा धडाका, जागावाटपाचा प्रश्न सोडवणार

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर! पुण्यात 144 CRPC ची ऑर्डर सुधारित ऑर्डर 31 मार्च पर्यंत लागू राहणार; जाणून घ्या नवीन नियम व अटी

Ajit Pawar On PMC Property Tax | समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकीसाठी जप्तीसारख्या कारवाया करू
नयेत; पालकमंत्री अजित पवार यांचे महापालिकेला आदेश

Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाख रूपयांची देणगी सुपूर्त (Videos)

Editors Guild Of Pune-Pimpri | पुणे-पिंपरी डिजीटल मिडियाच्या Editors Guild ची स्थापना, कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न