Pune News | आम्ही आमचे कार्बन फुटप्रिंट्स कमी करू ! आगळ्यावेगळ्या युथ क्लायमेट समिटमध्ये पुण्यातल्या 80 शाळेतील विद्यार्थ्यांचा निर्धार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | शहरीकरणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, पुणे शहरातील पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाने त्यादृष्टीने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, आणि त्याकरिता आम्ही विद्यार्थी आमच्या दैनंदिन जीवनात हवा, पाणी आणि उर्जेचा अपव्यय करणार नाही तसेच प्रदुषण करणार नाही, असा निर्धार शनिवार, २७ जानेवारी २०२४ रोजी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या युथ क्लायमेट समिटमध्ये सहभागी झालेल्या ८० शाळांमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी केला. त्याकरिता आम्ही आमच्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल करू आणि आमचे कार्बन फुटप्रिंट्स कमी करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. (Pune News)

खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan) यांनी स्थापन केलेल्या अलर्ट या संस्थेच्या वतीने, वनराई आणि सृष्टी संस्थांच्या सहभागाने एक दिवसीय युवा हवामान शिखर परिषदेचे घोले रस्त्यावरील पंडीत जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील ८० हून अधिक शाळांमधून हवामान बदल या विषयावर सहावी ते आठवी या इयत्तेमधील विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अनेकविध उपक्रमांचे वर्षभर सातत्याने आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी विषयवार संशोधन करण्यास उद्युक्त करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून, युवा परिषदेमध्ये हवा, उर्जा व पाणी आणि नागरीकरण या प्रमुख मुद्यांवर इयत्ता ६ ते ८ मधील विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.

यामध्ये झुबिन वहाणवटी व आर्या जठार (विद्या वॅली शाळा), अवनी वाणी, अहना कुलकर्णी, स्वरा जोशी आणि विवियन
भाटिया (दि ऑर्चिड स्कुल), साई कृष्णा अय्यर (लॉयला हायस्कुल), निधी चावरे व अनया सुराणा (सिटी प्राईड स्कुल, निगडी), अवनी गुप्ता (भारती विद्यापीठ रविंद्रनाथ टागोर शाळा), करण नंबिसान व श्रीकन्या गिरमे (दि कल्याणी स्कुल), या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादरीकरण करून, त्याबाबतच्या उपाययोजनाही सुचवल्या.

हवा, उर्जा व पाणी आणि नागरीकरण विषयक सत्रांमध्ये प्रांजली देशपांडे, रणजित गाडगीळ, डॉ. गुरूदास नूलकर,
शैलजा देशपांडे, आंचल संत, संस्कृती मेनन आणि सारंग यादवाडकर, आदी अनुभवी पर्यावरणतज्ञांनी सहभागी होऊन
विद्यार्थ्यांना विषयवार मुद्देसुद मार्गदर्शन केले. पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ हे
या परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हवामानाच्या बदलाचा गंभीर धोका दिवसेंदिवस
वाढत असून, कोट्यवधी लोक त्याला दररोजच बळी पडत असून, त्याविरूद्ध एकत्रितपणे लढण्यासाठी जगाभरातील शहरी
व ग्रामीण भागातील युवकांमधील संवाद वाढला पाहिजे, असे प्रतिपादन सत्यजित भटकळ यांनी परिषदेचा समारोप
करताना केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar | भाजपच्या आदेशाने माझ्यावर गुन्हा दाखल ! कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर; मला जेलमध्ये पाठविण्याचा पोलिसांचा प्लॅन (Video)

Pune Sahakar Nagar Crime | ब्रेकअप झाल्याच्या रागातून तरुणीचा अश्लिल व्हिडिओ केला व्हायरल, सहकारनगर पोलिसांनी गोव्यातून आवळल्या मुसक्या

ACB Trap On API | दोन लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात