Homeताज्या बातम्याPune News | गणेशखिंड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम...

Pune News | गणेशखिंड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम 6 ऑक्टोबरपासून सुरू; चांदणी चौकातील उड्डाणपुल 2 ऑक्टोबरला पाडणार, 2 ऑक्टोबरला मुंबई- बंगळूर महामार्गावर ‘मेगाब्लॉक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | गणेशखिंड रस्त्यावरील (Ganeshkhind Road) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम ६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी या परिसरातील वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये (Divisional Commissioner’s Office) महानगर परिवहन प्राधीकरणच्या (Metropolitan Transport Authority) उच्चस्तरीय अधिकार्‍यांची आज बैठक झाली. या बैठकीमध्ये वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी सुचविण्यात आलेल्या पर्यायांचा अहवाल पुढील सात दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pune News)

 

विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल (PMRDA Commissioner Rahul Mahiwal), जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Collector Rajesh Deshmukh), जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (District Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh), पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर (Vivek Kharwadkar), महापालिकेच्या पथ विभागाचे उपायुक्त व्हि.जी. कुलकर्णी (V.G. Kulkarni) यांच्यासह महामेट्रो (Mahametro), वाहतूक पोलिस (Traffic Police) आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये विद्यापीठ चौकातील मेट्रो व अन्य वाहतुकीसाठीच्या दुमजली उड्डाणपुलाचे (Double Decker Flyover) काम ६ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने सध्या पुलासाठीच्या आवश्यक पाईल फाउंडेशनचे काम सुरू करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२४ अखेर या पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार या कालावधीत गणेशखिंड रस्त्यालगत ११ मी. रुंदीचे बॅरीकेडींग करून एप्रिल २०२४ पर्यंत पायाचे काम पुर्ण करण्यात येणार आहे. मे २०२४ नंतर ११ मी. रुंदीचे बॅरीकेडींग काढून केवळ ३ मी. रुंदीचे बॅरीकेंडीक ठेवून रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. (Pune News)

 

पुलाच्या कामाच्या कालावधीत गणेशखिंड रस्त्यालगतच्या फूटपाथची रुंदी कमी करण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठ ते वैकुंठ मेहता संस्थे दरम्यान तात्पुरता रस्ता तयार करून पुढे रेव्हेन्यू कॉलनी येथे रॅम्प करून वाहतूक भोसलेनगरकडे वळविण्यात येणार आहे. यासाठी खडकी स्टेशन व परिसराीतल अंडरपास व लगतचे रस्तेही दुरूस्त करण्यात येणार आहे. मॉडर्न कॉलेज लगतच्या पाणी पुरवठा वाहीनीचे काम करून रस्ताही रुंद करण्यात येणार आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी चतुश्रृंगी पोलिस चौकीचे गेट उघडून विद्यापीठातील आतील बाजूने वाहतूक वळविण्यात येणार आहे. तसेच मॉडर्न कॉलेजमधील रस्त्याचे काम करून त्या मार्गे दुचाकी व तीनचाकी वाहने वळविण्यात येणार आहेत.वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार ट्रॅफीक वॉर्डन पुरविण्याची जबाबदारी पीएमआरडीएवर निश्‍चित करण्यात आली आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपुल २ ऑक्टोबरला पाडणार; २ ऑक्टोबरला मुंबई- बंगळूर रस्त्यावर ‘मेगाब्लॉक’
चांदणी चौकात सुरू असलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या (Pune Chandani Chowk Bridge Demolition)
कामासाठी पुणे मुंबई महामार्ग (Pune Mumbai Highway)
ओलांडण्यासाठी उभारण्यात आलेला उड्डाणपुल २ ऑक्टोबरला पाडण्यात येणार आहे.
हा उड्डाणपुल पाडण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया जवळपास पुर्ण झाली आहे. हा पुल पाडताना महामार्गावर मेगाब्लॉक
(Megablock) घेण्यात येणार आहे. उड्डाणपुल पाडल्यानंतर सर्व राडारोडा उचलून
या ठिकाणी अतिरिक्त सर्व्हिस रस्ता हा वॉरफुटींगवर ५ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार आहे.
याचे सर्व नियोजन करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणावर निश्‍चित करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune News | Work on double-decker flyover at Pune Vidyapeeth Chowk on Ganeshkhind road to start from October 6; Chandni Chowk flyover to be demolished on October 2, ‘Megablock’ on Mumbai-Bangalore highway on October 2

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | खासदार भावना गवळींचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, कालपर्यंत मी त्यांची ताई होते, आज लगेच बाई झाले

Buldhana Poisoning Case | भगर पीठ खाल्याने 20 जणांना विषबाधा, बुलढाणा मधील घटना

Satara ACB Trap | 2 हजार रुपये लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकुन आणि खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News