Pune News : वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक ! पुण्यातील साडेचार वर्षाच्या प्रेषानं 4.17 मिनीटांमध्ये राष्ट्रध्वज पाहून सांगितले तब्बल 150 देशाचं अन् राजधानीचं नाव (व्हिडीओ)

पुणे : (पुनम काटे) – पुण्यातील 5 वर्षीय प्रेषा भरत खेमाणी ने नुकतेच वल्ड रेकॉर्ड इंडिया बुक मध्ये नाव नोंदवले गेले आहे. आपल्या तल्लख बुध्दीच्या जोरावर प्रेषा ने कमी वयात रेकॉर्ड करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्रेषा ने यंगेस्ट किड टू आयटेंन्टीफाईड फ्लैग एन्ड नेम कंट्री व्हीथ मिनिमम टाईम हा खिताब पटकवला आहे. वल्ड रेकॉर्ड इंडिया ने तिची नोंद घेऊन तिला वरील पुरस्कार प्रदान केला आहे. प्रेषा 4.17 सेकंदात 150 देशांचे फ्लैग बघून त्यांची नावे स्पष्ट पणे सांगते.

समाजात ऐकीकडे मुलगी नको चा सूर असतो परंतु प्रेषा ची आई संगीता खेमाणी प्रेषा बद्दल बोलताना म्हणाल्या कि प्रेषा आमच्यासाठी देवाची सुंदर भेट आहे. प्रेषाला लहानपणापासून जिओग्राफी व ग्लोबल विषयात रुची आहे. आमचे फैमिलि मित्र काटकर यांनी प्रेषा ला लॉकडाउन मध्ये एटलस ऑफ द वल्ड बुक भेट म्हणून दिले होते. या बुक मधील फ्लैग बघुन ति मला देशाची नावे विचारत व ती ते न विसरता लक्षात ठेवून कधीही विचारले असता लगेच सांगत. तिची हि तल्लख बुध्दिमता बघून आम्ही ही भारावून गेलो. 2 महिन्यात ती न थांबता. फक्त फ्लैग बघून लगेच देशांची व त्यांच्या राजधानी ची नावे सांगायला लागली. तिचे ही बुध्दिमता अनोखी आहे. हे आम्हाला तेव्हा समजले. नंतर प्रेषा च्या स्कूल च्या मदती ने तिचे नाव वल्ड रेकॉर्ड इंडिया बुक मध्ये तिचा रेकॉर्ड नोंदवण्यासाठी दिले. तिने केवळ 4.17 सेकंदात 150 देशांचे फ्लैग बघून देशा चे व राजधानी चे नाव सांगितले व तिच्या नावे कमी वयात कमी वेळात देशांचे फ्लैग बघून त्यांची नावे सांगण्याचा रेकॉर्ड नोंदवण्यात आला. यासाठी तिला गोल्ड मेडल ही भेटले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रेषा घरी सामान्य मुलांन सारखीच वागते. मस्ती करते. तिला डान्स व नॉन फायर कुकिंग ची आवड आहे. त्याच बरोबर ती रेसिपी ही सांगते असे संगीता खेमाणी यांनी आवर्जुन सांगितले. भविष्यात विविध देशांचे चलन व पंतप्रधान यांची तिला माहिती देऊन त्या वर रेकॉर्ड व्हावा. यासाठी आम्ही प्रयत्न करु. प्रेषा ची आई हाऊस वाईफ आहे. त्यांनी एम.एस.सी मैथ्स व एमबीए चे शिक्षण घेतले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

प्रेषा चे वडील भरत खेमाणी जे सी.ए. आहेत ते म्हणाले कि प्रेषा आमच्या साठी एक आर्शिवाद आहे. आमच्या पिढीत तिच्या ऐवढे बुध्दीमान कोणी नाही. एवढा कमी वयात तिची स्मरणशक्ती प्रबळ आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. प्रेषा च्या रेकॉर्डसाठी संस्कृती स्कूल च्या फाउंडर डायरेक्टर देवयानी मुंगली यांनी सहकार्य केले आहे. या नंतर गिनीज बुक मध्ये ही तिची नोंद व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे ग्लोबल बुक रेकॉर्ड यु.के. साठी ति पात्र ठरली आहे. लवकरच तिला अजून एक पुरस्कार मिळेल. प्रेषा पुण्याजवळील भुकुम येथील संस्कृती स्कूल मध्ये यूकेजी मध्ये शिकत आहे. शिक्षणा बरोबरच तिचा हा वेगळा छंद जोपासन्याचे कार्य तिचे आई-वडील करत आहेत. खेमाणी कुटुंबिय हे मुळचे मध्यप्रदेशमधील उज्जैनचे असून गेल्या 6 वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत.