Pune Pashan-Sus Road Accident | पाषाण-सूस रोडवर अपघात, संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pashan-Sus Road Accident | पुण्यातील पाषाण-सूस रोडवर झालेल्या अपघातात कार चालक संगणक अभियंता (Computer Engineer) असलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात मृत संगणक अभियंता तरुणीने दुसऱ्या एका कारला पाठिमागून धडक दिल्याने एकजण जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.24) रात्री नऊच्या सुमारास पाषाण येथील वरदायनी सोसायटी समोर झाला आहे.

कीर्ती कृष्णा माळवे (वय-40 रा. इस्टीका सोसायटी, बाणेर) उर्फ केतकी विश्वास नागटीळक (माहेरचे नाव) असे मृत्यू झालेल्या संगणक अभियंता तरुणीचे नाव आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी तिच्यावर आयपीसी 304 (अ), 279, 337 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अभिक सिद्धार्थ चॅटर्जी (वय-24 रा. निशिगंधा अपर्टमेंट, सूस-पाषाण रोड, पुणे) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) रविवारी (दि.25) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ती माळवे एका आयटी कंपनीत कामाला होत्या.
तर जखमी चॅटर्जी एका जीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतात.
शनिवारी रात्री कीर्ती या त्यांच्या कारमधून (एमएच 03 एआर 9240) पाषाण-सूस रोडने भरधाव वेगात जात होत्या.
वरदायिनी सोसायटीसमोर वळण घेत असताना कीर्ती यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तेथून जाणाऱ्या चॅटर्जी
यांच्या कारवर कीर्ती यांची कार पाठीमागून जोरात आदळली. अपघातात कीर्ती गंभीर जखमी झाल्या.
तर चॅटर्जी जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेतील कीर्ती यांना खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना