Pune Pimpri Chinchwad Accident News | दोन वेगवेगळ्या अपघातात रस्ता दुभाजकला धडकून दोघांचा मृत्यू, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झाला आहे. हे अपघात महाळुंगे आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या (Hinjewadi Police Station) हद्दीत झाले आहे. भुषण संजय बोरसे (वय-26 रा. खालुंब्रे ता. खेड मुळ रा. जिंतुर ता.जि. धुळे) आणि मेघा मोहन बऱ्हाटे असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. (Pune Pimpri Chinchwad Accident News)

भुषण बोरसे त्याच्या पल्सर दुचाकीवरुन (एमएच 18 सीए 5516) एअर लिक्विड चौक ते जी.ई. कंपनीकडे जाणाऱ्या रोडवरुन भरधाव वेगात जात होता. सावरदरी येथील वजन काट्याजवळ असलेल्या रस्ता दुभाजकाला त्याची दुचाकी धडकली. यामध्ये गंभीर जखमी होऊन भुषण याचा मृत्यू झाला. हा अपघात 1 जानेवारी रोजी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार सुभाष पवार यांनी मंगळवारी (दि.9) महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी भुषण बोरसे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अपघाताची दुसरी घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि.9) पहाटे साडे चारच्या सुमारास घडली आहे.
मयत मेघा बऱ्हाटे तिचा मित्र केदार वाघमारे याच्या दुचाकीवरुन (एमएच 45 ए आर 5486) पुणे मुंबई महामार्गावरुन
जात होती. केदार याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन बेदकारपणे चलवल्याने दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली.
यामध्ये केदार जखमी झाला तर मेघाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी मेघाचे वडील मोहन प्रल्हाद बऱ्हाटे (वय-55 रा. जळगाव रोड, भुसावळ) यांनी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. यावरुन केदार राजाराम वाघमारे (वय-23 रा. मारुंजी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव राठोड यांचे निधन

Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 81 वी स्थानबध्दतेची कारवाई