Pune Pimpri Chinchwad Accident News | बंडगार्डन, हडपसर परिसरातील अपघातात दोन जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Accident News | पुणे शहरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील बंडगार्डन आणि हडपसर परिसरात झालेल्या चार अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Accident News)

पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) परिसरात भरधाव कारच्या धडकेत एका 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 1 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला असून बंडगार्डन पोलिसांनी एका अनोळखी कार चालकावर आयपीसी 304अ, 279, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी विलास चंद्रकांत केकाण (वय-31) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे.

दुचाकीची समोरासमोर धडक

हडपसर परिसरातील मांजरी येथील महादेवनगर येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोनजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.4) रात्री साडे दहाच्या सुमारास गणपती मंदिरासमोर झाला. याप्रकरणी आकांक्षा यतिराज जाधव (वय-28 रा. राजबाग कॉलनी, मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली. यावरुन अनोळखी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आकांक्षा जाधव यांचे पती व मुलगी मायरा हे दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी अनोळखी दुचाकीस्वाराने भरधाव वेगात गाडी चालवून फिर्यादी यांच्या पतीच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांचे पती यतिराज हे गंभीर जखमी झाले आहेत तर मुलगी मायरा किरकोळ जखमी झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

हडपसर परिसरातील दुसरा अपघात मंगळवारी (दि.6) रात्री तीनच्या सुमारास 15 नंबर चौकात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन चालवून एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये पवेश संजय वानखेडे (रा. वाशिम) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याबाबत चैतन्य दिलीप पागृत (वय-31 रा. कात्रज कोंढवा रोड, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक मल्लीनाथ जयपरक गंजलखेड (रा. गुलबर्गा, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टँकरची पादचाऱ्याला धडक

रस्त्याने पायी जाणाऱ्या एका 56 वर्षीय व्यक्तीला भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरने धडक देऊन गंभीर जखमी केले.
हा अपघात झेड कॉर्नर मांजरी येथे रविवारी (दि.4) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास झाला.
याप्रकरणी परिमल चंदा सरकार (वय-56 रा. झेड कॉर्नर, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
यावरुन अनोळखी टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार दिवेकर
करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

किरकोळ कारणावरुन कुटुंबाला मारहाण, दोघांना अटक; हडपसर परिसरातील घटना

Latur Crime News | पोलीस ठाण्यात अधंश्रद्धेचा धक्कादायक प्रकार, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी चक्क बोकडाचा बळी; बिर्याणीही बनवून खाल्ली