Pune Pimpri Chinchwad Crime | व्यावसायिकाकडून 12 लाख घेतल्याचा आरोप ! सहाय्यक पोलीस आयुक्त घनवट, पोलीस अंमलदार विजय शिर्केविरूध्द खंडणीचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक (Satara LCB PI) आणि सध्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Commissionerate) सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असणारे पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanwat) आणि पोलीस राईटर विजय शिर्के (Police writer Vijay Shirke) यांच्यावर खंडणीचा (Extortion) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पद्माकर घनवट आणि विजय शिर्के यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात (Satara City Police Station) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने तक्रार केली असून घनवट आणि शिक्रे यांनी 12 लाख 30 हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत एका बांधकाम व्यावसायिक राजेंद्र चोरगे Builder Rajendra Chorge (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि पोलीस हवालदार विजय शिर्के यांच्यावर खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

तक्रारदार चोरगे यांची सातारा शहरातील शाहूनगरमध्ये गुरुकुल एज्युकेशन सोसायटी (Gurukul Education Society) संस्था असून ते मागील 14 वर्षापासून या संस्थेचे चेअरमन आहेत. संस्थेच्या विरोधात कोणतीही तक्रार नसताना स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि राईटर शिर्के यांनी संस्थेत बेकायदेशीर घुसखोरी करुन गुन्हेगारांना मदत केली. याशिवाय पोलीस ठाण्यातील चौकशी दरम्यान त्रास देऊन ब्लॅकमेल केले.

घनवट आणि शिर्के यांनी 25 लाख रुपये खंडणी मागून 12 लाख 30 रुपये घेतले. तसेच वारंवार पोलीस ठाण्यात बोलवून मानसिक त्रास देणे, पत्नी तसेच गुरुकुलच्या महिला प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना सूर्यास्तानंतर ताब्यात ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या दोघांची चारवेळा प्राथमिक व विभागीय चौकशी
(Departmental Inquiry) केली. या चौकशी अहवालामध्ये दोघांनी कसुरी केल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले.
त्यामुळे न्यायालयाने पोलीस अधिकारी पद्माकर घनवट आणि पोलीस हवालदार विजय शिर्के
यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर कोर्टाने दोघांविरोधात गुन्हा दाखल
करुन पुढील कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असेही चोरगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Accused of taking 12 lakhs from a businessman! Extortion case against Assistant Commissioner of
Police Ghanwat, Police Officer Vijay Shirke

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Trade Finance Cooperation | “सर्व देशांनी, कागदविरहित आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आवश्यक ते कायदे आणण्याचा प्रयत्न करावा”

Sanjay Naval Koli Death | कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन