Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँच : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या 3 सट्टेबाजांना तळेगाव दाभाडेमध्ये अटक (Video)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठया प्रमाणावर बेटिंग घेणार्‍या 3 सट्टेबाजांना छापा टाकून तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील लेक पॅराडाईज सोसायटी (Lake Paradise Society) येथून अटक केली आहे (IPL Cricket Betting Arrest). त्यांच्याकडून 7 मोबाईल, एक लॅपटॉप, 5 वहया आणि इतर ऐवज असा सुमारे एक लाख रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pimpri Chinchwad) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime Branch News)

रोमी सुरेश नेहलानी Romi Suresh Nehalani (36, रा. एचबी 28/1, दिप मोटर्स समोर, वैष्णव माता मंदिराजवळ, पिंपरी चिंचवड, पुणे), विनोद राजु सतिजा Vinod Raju Satija (32, रा. सुखवाणी किस्टल, सी/701, पिंपरीगाव, पुणे) आणि लखन राजु गुरूबानी Lakhan Raju Gurubani (24, रा. आयप्पा मंदिराजवळ, आयप्पा कृपा बिल्डींग, फ्लॅट नं. 2, पिंपरी-चिंचवड, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात पोलिस नाईक शैलेश गुलाब मगर यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime Branch News)

काही जण हे मावळ तालुक्यातील (Maval Taluka) तळेगाव दाभाडे येथील लेक पॅराडाईज सोसायटीच्या
रो हाऊस नंबर 44 मध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठया प्रमाणावर बेटिंग (Online Betting On IPL)
घेत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना (Pimpri Chinchwad Police) मिळाली होती.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँचच्या खंडणी विरोध पथकाने मंगळवारी रात्री पावणे 11
वाजण्याच्या सुमारास रो हाऊसवर छापा टाकला. त्यावेळी आरोपी रोमी सुरेश नेहलानी, विनोद राजु सतिजा
आणि लखन राजु गुरूबानी हे तिघे इंडियन प्रिमीयर लिग Indian Premier League (IPL) टी-20 च्या
मुंबई इंडियन्स विरूध्द सन राईजर्स हैदराबाद (Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad) या
क्रिकेट मॅचवर मोबाईल कॉलव्दारे बेटिंग घेत होते. पोलिसांनी रो हाऊसमधून 7 मोबाईल, एक लॅपटॉप आणि
इतर ऐवज असा एकुण सुमारे एक लाख रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खाडे (API Khade) करीत आहेत.

सदरील कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त मनोज लोहिया,
अप्पर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार,
पोलिस अंमलदार सुनिल कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, विजय नलगे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी,
शैलेश मगर, प्रदीप गुट्टे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलिस हवालदार नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | 3 bookies arrested in Talegaon Dabhade for betting on IPL cricket matches

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे-पिंपरी क्राईम न्यूज : पिंपरी पोलिस स्टेशन – विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नावाने बनावट सर्टिफिकेट तयार करुन संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न

Benefits of Pomegranate | ’डाळिंब’ आरोग्यासाठी ब्रम्हास्त्र, रोज करा सेवन; हृदय मधुमेह आणि सूजसंबंधी…

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : अखेर मिळकत करात 40 टक्के सूट देण्याचा निर्णय ! 1 मे पासून नवीन बिलांचे वाटप, 30 जूनपर्यंत बिल भरणार्‍यांना सवलत