Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : अखेर मिळकत करात 40 टक्के सूट देण्याचा निर्णय ! 1 मे पासून नवीन बिलांचे वाटप, 30 जूनपर्यंत बिल भरणार्‍यांना सवलत

2019 पासून अधिकचा मिळकत कर भरणार्‍यांना पुढील बिलांमध्ये वजावट मिळणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax | पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) हद्दीतील मिळकत धारकांना देण्यात येणारी 40 % मिळकत करातील सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Decision Today) घेण्यात आला. याचा थेट लाभ पाच लाखांहून अधिक मिळकतींना होणार असून 2019 पासून ही सवलत काढून घेण्यात आल्यानंतर महापालिकेने आकारलेल्या कराची आगामी बिलामधून वजावट केली जाणार आहे. या निर्णयाचा पुणेकरांना फायदा झाला असला तरी महापालिकेचे उत्पन्न 125 ते 150 कोटी रुपयांनी कमी होणार आहे. (Pune PMC Property Tax)

 

पुणे महापालिकेकडून निवासी मिळकत धारकांना त्यातही घरमालकांना 1969 पासून मिळकत करामध्ये 40 टक्के सवलत देण्यात येत होती. शासनाने ऑडीटमधील आक्षेपांनंतर 2019 मध्ये ही सवलत बंद केली. त्यामुळे 2019 नंतर नव्याने कर आकारणीखाली आलेल्या सुमारे 1 लाख मिळकतींकडून सवलत काढूनच पुर्ण कर आकारणी करण्यात येत होती. तर त्यापुर्वीच्या मिळकतींकडून देखिल पूर्ण कर आकारणीच्या नोटीसेस काढण्यास सुरवात करण्यात आली होती. एकीकडे महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी पाच वर्षात कुठलिही करवाढ केली नसल्याचे जाहीर केले असले तरी नागरिकांना मोठयाप्रमाणावर बिले येउ लागल्याने असंतोष पसरला होता. (Pune PMC Property Tax)

 

यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत नागरिकांनी कर भरू नये, असे आवाहन केले होते. परंतू कुठलाच निर्णय न झाल्याने आर्थिक वर्षातील सहामाहीनंतर नागरिकांना थकबाकीवर दंड आकारण्यात येउ लागला. दरम्यान, नुकतेच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेस महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जाहीर सभांमधून 40 टक्के सवलत काढून घेतल्यावरून जोरदार टीका केली. एवढेच नव्हे तर नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी विधी मंडळामध्ये 40 टक्के कर सवलत पुर्ववत करावी तसेच मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरातही 500 चौ.फुटांच्या घरांना करमाफ करावा, अशी मागणी केली.

तसेच राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) आणि चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांनी विधीमंडळात आंदोलन केले. यामुळे खडबडून जागे झालेल्या भाजपचे स्थानीक आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेउन ४० टक्के सवलत पुर्ववत देण्याची तसेच शास्तीकर माफीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेउन 40 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. तसेच अधिवेशनानंतर पहिल्याच मंत्री मंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते.

 

परंतू एक एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होईपर्यंत मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय न झाल्याने महापालिका प्रशासनाने नवीन बिलांची छपाई व वाटपाची मुदत एक महिन्यांनी वाढविली. अखेर आज झालेल्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून एक मेपासून नवीन दराने नागरिकांना बिलांचे वाटप करण्यास सुरूवात होणार आहे.

 

मंत्रीमंडळाने पुणेकरांना मिळकत करामध्ये पुर्वीप्रमाणे 40 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा अध्यादेश येत्या काही दिवसांत महापालिकेला उपलब्ध होईल.
मंत्री मंडळाच्या निर्णयानुसार 2019 पासून ज्या मिळकतींकडून 40 टक्के सवलत काढून कर आकारणी झाली आहे,
त्यांनाही त्याचवर्षीपासून सवलत देण्यात येईल. या कालावधीत ज्या मिळकतधारकांनी 40 टक्क्यांसह बिले भरली आहेत,
त्यांची अधिकची रक्कम परत करावी लागणार आहे.
ही रक्कम प्रत्यक्षात चालू वर्षीच्या बिलासह पुढील काही बिलांमधून वजा करूनच बिले देण्यात येतील.
शासनाचा अध्यादेश आल्यानंतर याबाबत अंतिम धोरण तयार करण्यात येईल.
ही सवलत परत द्यावी लागणार असल्याने महापालिकेचे उत्पन्न 125 ते 150 कोटी रुपयांनी कमी होणार आहे.
तसेच पुढील काही दिवसांत नवीन दरानुसार बिलांची छपाई आणि वाटप सुरू करण्यात येईल.
30 जूनपर्यंत बिल भरणार्‍यांना सर्वसाधारण करामध्ये सूट देण्यात येईल.

 

– विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक
( Vikram Kumar, Pune Municipal Commissioner and Administrator)

 

Web Title :- Pune PMC Property Tax | Pune Municipal Corporation: Finally decided to give 40 percent discount on income tax! Allotment of new bills from May 1, discount to bill payers till June 30

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Maharashtra Political News | अजित पवारांच्या भोवती संशयाचे ढग, चार दिवसांनी फडणवीस माध्यमांसमोर आले, मात्र…

Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या बैठकीतील 12 निर्णय