Pune Pimpri Chinchwad Crime News | बसमध्ये महिलांचे दागिने चोरणाऱ्या परराज्यातील चोरट्याला सहकानगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या वृद्ध नागरिकांना व महिलांना हेरून त्यांचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry), मोबाईल पर्स चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) पुण्यात येऊन प्रवाशांचे दागिने चोरी करीत होता. आरोपीकडून 65 हजार रुपयांचा ऐवज जप्त करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

चांदबाबु अलीहुसेन शेख (वय-30 रा. बेचाळीस चौक, कोंढवा खुर्द, मुळ रा. गाव गौरव काला पोस्ट महमदपुर, ता. कैरनलगड जि. गोंडा, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत जिजाबाई लक्ष्ण कदम (वय-72 रा. आंबेगाव खु., जांभुळवाडी, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

फिर्यादी महिला गुरुवारी (दि.28) सायंकाळी सहाच्या सुमारास पद्मावती बस स्टॉप (Padmavati Bus Stop) ते बालाजीनगर (Balajinagar) असा पीएमटी बसमधून प्रवास करत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन आरोपीने अहिल्यादेवी चौकात त्यांच्या हातातील 40 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची बांगडी कटरच्या सहाय्याने तोडून चोरून पळून जात होता. त्यावेळी फिर्यादी व नागरिक तसेच गस्तीवरील पोलीस अंमलदार सुशांत फरांदे व महेश मांडलीक यांनी पाठलाग करुन आरोपीला पकडले होते.

पोलिसांनी आरोपीकडून 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी व 100 रुपये किमतीचे कटर जप्त केले. आरोपीची पोलीस कोस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता, आरोपीने दोन ते अडीच महिन्यापूर्वी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची 25 हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडून सहकारनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

सहकारनगर पोलिसांनी महिला व वृद्ध नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक बसमधुन प्रवास करताना सतर्कता बाळगुन काहीही संशयास्पद प्रकार आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 112 किंवा महिला हेल्पलाईन नंबर 1091 यावर तात्काळ मदतीसाठी संपर्क साधावा.

ही कामगीरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (Sr. PI Surendra Malale), पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने (PI Sandeep Deshmane) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे (PSI Rahul Khandale), सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार सुशांत फरांदे, महेश मंडलिक, बजरंग पवार, नवनाथ शिंदे, अमोल पवार, निलेश शिवतरे, भुजंग इंगळे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ यांच्या पथकाने केली.