Pune Pimpri Chinchwad Crime News | बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चाकू आणि गिलोरचा धाक दाखवून एका तरुणाला जबरदस्तीने पेट्रोल पंपावर नेले. त्याठिकाणी दुचाकी मध्ये पेट्रोल भरून दुचाकी जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार 14 जानेवारी रोजी रात्री सव्वा दोनच्या सुमारास बोपदेव घाट (Bopdev Ghat) माथ्यावर घडला होता. विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पल्सर आणि चाकू जप्त केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

नागेश संजय चव्हाण (रा. मोमीन आखाडा, राहुरी, जि. अहमदनगर), चेतन सिताराम खैरे (रा. गाव नाझरे कडे पठार, खैरेवाडी, ता. पुरंदर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी व त्यांचे इतर तीन मित्र दुचाकीवरुन फिरण्यासाठी बोपदेव घाट माथ्यावर गेले होते. त्यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी तुम्ही एवढ्या रात्री घाटात काय करत आहात? अशी विचारणा केली. आरोपींपैकी एकाने चाकू व गिलोर दाखवून फिर्यादी याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांच्याकडे पैसे नसल्याने आरोपींनी पल्सर गाडीची (एमएच 15 जीई 4139) चावी काढून घेतली. गाडीत पेट्रोल नसल्याने आरोपींनी फिर्यादी यांचा मित्राला जबरदस्तीने गाडीवर बसवून सासवड रोडवरील पेट्रोल पंपावर नेले. त्याठिकाणी गाडीत पेट्रोल भरुन घेऊन दुचाकी चोरून नेली होती. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बोपदेव घाटात होणाऱ्या जबरी चोरीच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) तपास पथकाकडून आरोपींचा शोध घेतला जात होता. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी बोपदेव घाट परिसरात सापळा रचला. पोलिसांनी साध्या वेशात रोडच्या बाजुला थांबुन संशयीत वाहने व व्यक्तींचा शोध घेत होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन तीन जण सासवड कडून पुण्याकडे येताना दिसले. त्यापैकी एका दुचाकीला समोरील व मागील नंबर प्लेट नसल्याचे आढळून आले. आरोपी घाटमाथ्यावर फिरण्यासाठी आलेल्या लोकांकडे पाहून आपआपसात बोलत होते.

त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांना पकडण्यात पथकाला यश आले.
तर एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. आरोपींकडून एक पल्सर दुचाकी व एक चाकू जप्त केला.
आरोपीकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता, काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटातून तीन तरुणांना चाकुचा धाक दाखवून
दुचाकी चोरल्याचे सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त शाहुराव साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे,
पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील,
सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सतिश चव्हाण, लवेश शिंदे,
शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : ‘कोई बीच में आया तो…’ हवेत कोयते फिरवून माजवली दहशत, दोघांवर FIR

रस्त्याच्या बाजूला लघुशंका केल्याच्या कारणावरून तरुणावर वार, तीन तृतीयपंथियांवर FIR; दिघी-आळंदी रोडवरील घटना

पिंपरी : सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, पती व सासु-सासऱ्याला अटक

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल, ”तुमच्याकडे जे बाजरबुणगे आलेत त्यांच्यावरच्या खटल्यांचं काय?”

पिंपरी : भावाला शिवागाळ केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार