Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : ‘कोई बीच में आया तो…’ हवेत कोयते फिरवून माजवली दहशत, दोघांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कोयत्याचा धाक दाखवून एका मजूर तरुणाला लुटले. तसेच तुरुणाने आरडा ओरडा केल्यानंतर जमलेल्या लोकांकडे पाहून हवेत कोयता फिरवून ‘कोई बीच में आया तो काट डालुंगा’ असे म्हणत धमकी देऊन दहशत माजवली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पिंपरी ब्रीज खालील सार्वजनिक ठिकाणी बुधवारी (दि.31 जानेवारी) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत हिरालाल श्रीमिसरी मंडल (वय-32 रा. गांधीनगर, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन लड्ड्या बहोत (वय-20 रा. सेनेट्री चाळ, पिंपरी), राहूल्या लखन (वय-25) याच्यावर आयपीसी 392, 504, 506, 34, सह आर्म अ‍ॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हमाली काम करतात. बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथील भाजी मंडई जवळ नेहमीप्रमाणे हमालीचे काम करत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. आरोपी राहूल्या फिर्यादी जवळ येऊन पकडले. त्याने अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची भिती दाखवून फिर्यादीच्या खिशातून जबरदस्तीने 950 रुपये काढून घेतले. यानंतर फिर्यादी यांच्याकडे कोयता रोखून ‘किसी को कुछ बोला तो याद रख’ अशी धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे त्याठिकाणी लोक जमा झाले. आरोपीने जमलेल्या लोकांसमोर हवेत कोयता फिरवून ‘कोई बीच में आया तो काट डालुंगा’ असे म्हणत दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचा सवाल, ”आनंद व्यक्त केला, मग परत उपोषणाची वेळ का आली?”

MNS Chief Raj Thackeray | २०२४ मध्ये पंतप्रधानपदी कोण असावे? राज ठाकरेंनी दिले खास शैलीत उत्तर, ”यासाठी चाचपणी…”

Sharad Mohol Murder Case | ‘विठ्ठल शेलार, गणेश मारणेकडून जीवाला धोका’; शरद मोहळच्या पत्नीचा पुरवणी जबाब

Pune Lok Sabha | पुणे लोकसभा निवडणुक भाजपला ‘जड’ जाणार? इच्छुकांच्या पाठीशी संघटना विभागल्याचे परिणाम शहर भाजपला भोगावे लागणार!