Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : भावाला शिवागाळ केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दोन महिन्यांपूर्वी भावाला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.31 जानेवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्रिवेणीनगर चौकातील श्री स्वामी विवेकानंद शाळेसमोर घडला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत दानीश वाजीद शेख (वय-24 रा. त्रिवेणीनगर, श्री स्वामी विवेकानंद शाळेसमोर, निगडी) याने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून निलेश रेणवा (रा. टॉवर लाईन, म्हेत्रेवस्ती, चिखली) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर आयपीसी 307, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दानीश शेख याने दोन महिन्यापूर्वी आरोपी निलेश रेणवा याचा भाऊ दिनेश रेणवा याला शिवीगळ केली होती. याचा राग मनता धरुन आरोपी निलेश व त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादी याचा मित्र अमित सिंग याला शिवीगाळ करुन मारहाण करु लागले. त्यावेळी दानीश शेख त्यांना समजावण्यासाठी गेला. आरोपी निलेश रेणवा याने त्याच्याकडे असलेला कोयता काढून फिर्यादी याला ‘तुला ठेवतच नाही, तुला लय माज आला आहे’ असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचा सवाल, ”आनंद व्यक्त केला, मग परत उपोषणाची वेळ का आली?”

MNS Chief Raj Thackeray | २०२४ मध्ये पंतप्रधानपदी कोण असावे? राज ठाकरेंनी दिले खास शैलीत उत्तर, ”यासाठी चाचपणी…”

Sharad Mohol Murder Case | ‘विठ्ठल शेलार, गणेश मारणेकडून जीवाला धोका’; शरद मोहळच्या पत्नीचा पुरवणी जबाब

Pune Lok Sabha | पुणे लोकसभा निवडणुक भाजपला ‘जड’ जाणार? इच्छुकांच्या पाठीशी संघटना विभागल्याचे परिणाम शहर भाजपला भोगावे लागणार!